Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, कोकणात वेगळीच स्थिती, मुंबईसह 6 जिल्ह्यांचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही काळात मोठे बदल जाणवत आहेत. आज 11 सप्टेंबर रोजी मुंबईसह कोकणातील पावसाची तीव्रता कमी राहील.
1/5
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने कोकण किनारपट्टीवर दडी मारली आहे. मुसळधार पावसाऐवजी अधूनमधून रिमझिम सरी आणि हलका पाऊस एवढंच चित्र दिसत आहे. 11 ऑगस्ट रोजीही याच परिस्थितीची पुनरावृत्ती होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील महत्त्वाचे जिल्हे व मुंबई परिसरात आज कोणतेही सतर्कतेचे अलर्ट जारी केलेले नाहीत.

advertisement
2/5
मुंबईत दिवसभर वातावरण सौम्य राहणार असून, केवळ काही भागांमध्ये रिमझिम सरींची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील आणि कमाल तापमान सुमारे 30°C तर किमान तापमान 25°C पर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील 48 तास हीच स्थिती राहणार असून त्यानंतर मात्र हवापालट होईल.

3/5
नवी मुंबई आणि ठाण्यात आज एकूण हवामान सामान्य राहणार आहे. काही भागांत रिमझिम पाऊस पडू शकतो, मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही. उकाड्यापासून थोडा दिलासा मिळेल, पण तापमान 29°C ते 31°C च्या दरम्यान राहील. आकाश दिवसभर ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात देखील आज पाऊस हलक्याच स्वरूपात राहील. येथे वातावरण ढगाळ राहील आणि कमाल तापमान 31°C पर्यंत जाऊ शकते. समुद्रकिनाऱ्याजवळ काही भागांत हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. शनिवारपासून या स्थितीत बदल होणार असून पावसाचा जोर वाढेल.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अत्यल्प राहील. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळू शकतात, मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही. येथे कमाल तापमान 30-32°C च्या दरम्यान राहील, तर वाऱ्याचा वेग कमी राहील.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement