आमच्यात किती दम आहे ते दाखवतो, चीनने फोडला टॅरिफ बॉम्ब; संघर्ष नव्या टप्प्यावर, जगभरात भीतीचे वातावरण

Last Updated:

US-China Tariff War: अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्धाने नव्या उंचीला गाठले आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला प्रत्युत्तर देत चीननेही 126% पर्यंत आयात शुल्क वाढवल्याने जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे.

News18
News18
बीजिंग: अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ युद्ध अधिक तीव्र झालं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर एकूण 145 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर, चीनने याला प्रत्युत्तर देत 12 एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चीनकडून लावले जाणारे एकूण टॅरिफ 125 टक्क्यांवर पोहोचणार आहे.
चीनचा आक्रमक पवित्रा
चीनच्या वित्त मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात म्हटले की, अमेरिकेने चीनवर अत्याधिक टॅरिफ लावण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचा आणि आर्थिक कायद्यांचा सरळसरळ उल्लंघन करतो. हा निर्णय त्यांनी एकतर्फी दादागिरी आणि जबरदस्ती असा ठपका ठेवत फेटाळला आहे.
युरोपियन संघाला चीनकडून आवाहन
11 एप्रिल रोजी स्पेनच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीदरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी युरोपियन युनियनला आवाहन केलं की, त्यांनी अमेरिकेच्या एकतर्फी धाकदपटशाचा विरोध करण्यासाठी बीजिंगसोबत हातमिळवणी करावी.
advertisement
शेअर बाजारात घसरण
या नव्या टॅरिफ घोषणेनंतर अमेरिकन S&P 500 फ्युचर्स इंडेक्समध्ये घट झाली असून, हँगसेंग चायना एंटरप्रायझेस फ्युचर्समध्येही वाढीचा वेग मंदावला आहे. या सगळ्याचा परिणाम डॉलरवरही झाला असून, डॉलरची किंमत खाली गेली आहे.
ट्रम्प टॅरिफचा ‘धमकी’साठी वापर करतायत
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की, वॉशिंग्टनकडून बारंबार अत्याधिक टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केवळ एक संख्यात्मक खेळ राहिलेला नाही. तर याचा उद्देश राजकीय दबाव आणि धमकी देणं आहे..मंत्रालयाने पुढे सांगितले की, टॅरिफचं हे नाट्य आता केवळ एक विनोद बनून राहिलं आहे.
advertisement
भारतासह इतर देशांना दिलासा
दरम्यान, व्हाईट हाऊसने चीनवर टॅरिफचा दबाव कायम ठेवत इतर डझनभर देशांवर लावलेले "पारस्परिक" टॅरिफ 90 दिवसांसाठी स्थगित केले आहेत. भारतालाही या निर्णयाचा फायदा मिळालेला आहे.
ही टॅरिफ टक्कर फक्त व्यापारापुरती मर्यादित न राहता, जागतिक आर्थिक स्थैर्यावरही गंभीर परिणाम करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुढील काही आठवडे हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनी/
आमच्यात किती दम आहे ते दाखवतो, चीनने फोडला टॅरिफ बॉम्ब; संघर्ष नव्या टप्प्यावर, जगभरात भीतीचे वातावरण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement