कोल्हापुरचे सराफ व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेचे नेते किरण नकाते यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय ग्राहकांसाठी सोने खरेदीची ही चांगली संधी असू शकते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती 4 नोव्हेंबरपासून 6% ने घसरल्या आहेत. त्यात प्रति 10 ग्रॅम 4,750 रुपयांनी घट झाली आहे.
advertisement
सोन्याच्या किमतीत झालेली ही घसरण ज्यांच्या कुटुंबात लग्न होणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतात लग्न, सण आणि आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षण यासाठी सोने महत्त्वाचे मानले जाते. सोन्याचे भाव घसरल्याने लग्नाच्या तयारीत असलेले लोक या संधीचा फायदा घेऊ शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
तसेच 2024 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. यामध्ये ऑक्टोबरपर्यंत 39 वेळा डॉलरच्या विक्रमी उच्चांकाची नोंद झाली आहे. या वाढीमागे अनेक कारणे आहेत. सेंट्रल बँक खरेदी, वाढत्या आशियाई मागणीचे प्रमाण, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चितता या सर्व गोष्टी सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान म्हणून आकर्षित करतात.
गावात आजही शेणाने का सारवले जाते, काय आहे यामागचे वैज्ञानिक अन् धार्मिक कारण?
कोल्हापुरात सोन्याचे दर काय?
सोन्या-चांदीच्या दरांतील घसरणीमुळे बाजारात ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. लग्न सराईसाठी ग्राहकांना ही फायद्याची संधी आहे. सध्या कोल्हापुरात सोन्याचा भाव 76150 पर्यंत गाठला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे यावेळी सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
लग्नसराईसाठी सोने खरेदी ठरणार फायदेशीर -
आता लग्नसराईचा सिझन चालू आहे. लग्न म्हटल्यावर अनेक लोक सोने आणि चांदीचे दागिने घेतात. सोने-चांदीची आभूषणे तयार करून लग्नसोहळा आणखी शानदार करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, काही दिवसांपूर्वी या मौल्यवान धातूंमध्ये सातत्याने वाढ होत होती. पण आता जागतिक पातळीवर बदललेल्या परिस्थितीमुळे भारतात सोने आणि चांदीचा दर घसरला आहे. हीच घसरण कायम राहिल्यास सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा मिळेल. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठीही हीच नामी संधी असू शकते, असेही त्यांनी सांगितले.