TRENDING:

Gold Silver Price: बाजारात मोठी उलथापालथ! चांदी १२ हजारांनी स्वस्त, काही मिनिटांत सोन्याचे दरही धडाधड कोसळले; नेमकं काय घडतंय?

Last Updated:

Gold Silver Price Crash: शेअर बाजारातील ऐतिहासिक पडझडीनंतर आता सोन्या-चांदीच्या बाजारातही मोठा भूकंप झाला आहे. गुरुवारी MCX वर चांदीच्या किमती ५ टक्क्यांहून अधिक घसरल्या.

advertisement
Gold Silver Price Crash : अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला आज २० दिवस झाले. दिवसेंदिवस युद्ध तीव्र होत असून त्याचे परिणाम जागतिक बाजारपेठेवरही होत आहेत. शेअर बाजारातील ऐतिहासिक पडझडीनंतर आता सोन्या-चांदीच्या बाजारातही मोठा भूकंप झाला आहे. गुरुवारी MCX वर चांदीच्या किमती ५ टक्क्यांहून अधिक घसरल्या, तर सोन्याच्या दरातही २.५० टक्क्यांची मोठी घट पाहायला मिळाली. अवघ्या काही तासांत चांदी १२,००० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली असून सोनं प्रति १० ग्रॅम ४,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
बाजारात मोठी उलथापालथ, चांदीच्या दरात क्रॅश, १२ हजारांनी स्वस्त, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
बाजारात मोठी उलथापालथ, चांदीच्या दरात क्रॅश, १२ हजारांनी स्वस्त, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
advertisement

युद्धाचा भडका आणि बाजारावर दबाव

आखाती देशामध्ये सुरू असलेला संघर्ष आता तीव्र होऊ लागला आहे. इस्रायलने इराणच्या तेल प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर, इराणने प्रत्युत्तर म्हणून कतारमधील मोठ्या ऑईल रिफायनरीवर क्षेपणास्त्र डागले आहेत. या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती ११३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. सहसा युद्धकाळात सोन्याचे दर वाढतात, मात्र यावेळी चित्र उलटे दिसत आहे. गुंतवणूकदार सध्या 'कॅश' कडे वळत असल्याने सोन्या-चांदीत मोठी विक्री पाहायला मिळत आहे.

advertisement

अमेरिकन फेडच्या निर्णयाचा परिणाम...

सोन्या-चांदीच्या घसरणीमागे अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. फेडने व्याजदर स्थिर ठेवले असून भविष्यात दर कपातीची शक्यता फेटाळून लावली आहे. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी जागतिक तणावामुळे आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे संकेत दिले, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंची जोरदार विक्री झाली.

चांदीच्या दरात १.८५ लाखांची घसरण, सोन्याचा दरही घसरला...

advertisement

२९ जानेवारी २०२६ रोजी चांदीने ४.२० लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत चांदी १.८५ लाख रुपयांनी स्वस्त झाली असून सध्या ती २.३५ लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. दुसरीकडे, सोन्याचा दरही १.५० लाख रुपयांच्या खाली घसरला आहे. नफावसुली आणि जागतिक बँकांचे कडक धोरण यामुळे ही घसरण आणखी काही काळ सुरू राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: बाजारात मोठी उलथापालथ! चांदी १२ हजारांनी स्वस्त, काही मिनिटांत सोन्याचे दरही धडाधड कोसळले; नेमकं काय घडतंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल