TRENDING:

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

Last Updated:

Gold Silver Price: सोने देखील सातत्याने दराचा उच्चांक गाठत आहे. मात्र, शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सराफा बाजारात थोडीशी घसरण दिसून आली.

advertisement
Gold Price Today :  सरतं वर्ष २०२५ मध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. या दरवाढीच्या ट्रेंडमुळे गुंतवणूकदारांचा शेअर बाजारापासून दूर जाऊन सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळले आहेत. गेल्या वर्षी तुलनेत यंदा चांदीच्या दरात १३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, सोने देखील सातत्याने दराचा उच्चांक गाठत आहे. मात्र, शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सराफा बाजारात थोडीशी घसरण दिसून आली.
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
advertisement

आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. चांदी २,०१,२५० च्या सर्वकालीन उच्चांकावरून २,००,३३६ रुपयांवर आली आहे. तर चांदीच्या दरात १,६०९ रुपयांची घसरण दिसून आली. जीएसटीशिवाय सोने प्रति १० ग्रॅम १,३२,३९४ रुपयांवर उघडले. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १८० रुपयांची घट दिसून आली. चांदी प्रति किलो २,०६,३४६ रुपयांवर पोहोचली आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम १,३६,३६५ रुपयांवर पोहोचला आहे.

advertisement

या वर्षी आतापर्यंत सोन्याचे भाव ५६,६५४ रुपयांनी वाढले आहेत, तर चांदी १,१४,३१९ रुपयांनी वाढली आहे.

आजच्या दरानुसार, चांदीची किंमत ही त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा ९१४ रुपयांनी कमी आहेत.

>> कॅरेटनुसार सोन्याचे भाव

आज, २३ कॅरेट सोन्याच्या किमतीत ८० रुपयांनी घट झाली असून १,३१,८६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले. जीएसटीसह त्याची किंमत १,३५,८१९ रुपये आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

advertisement

२२ कॅरेट सोन्याची किंमत ७३ रुपयांनी घसरून १,२१,२७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आली. जीएसटीसह हा दर १,२४,९११ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर ६० रुपयांनी घसरून ९९,२९६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत १,०२,२७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

१४ कॅरेट सोन्याचा दरही ४६ रुपयांनी घसरला आहे. आज तो ७७,४५१ रुपयांवर उघडला आणि जीएसटीसह तो ७९,७७४ रुपयांवर आला आहे.

advertisement

सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १,००० ते २,००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA हे दिवसातून दोन वेळेस सोनं-चांदीचे दर जाहीर करते.

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल