TRENDING:

LPG सिलेंडर स्वस्त होणार हो! एका झटक्यात 327 रुपयांनी कमी होऊ शकतो भाव, तुम्हाला कधी मिळणार?

Last Updated:

सध्या महागाई ही प्रचंड वाढली आहे. यामध्ये गॅस सिलेंडरमुळे लोकं चिंतेत आहेत. गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे एलपीजी गॅसच्या किंमती या आणखी वाढतात की काय? अशी धास्ती सर्वसामान्यांमध्ये आहे. 

advertisement
नवी दिल्ली : सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लोकं चिंतेत आहेत. एकतर गॅस वेळेवर मिळत नाहीये. म्हणून लोकं चिंतेत आहे. पण तुटवडा वाढला तर एलपीजीच्या गॅसच्या किंमती वाढणार का? अशी भीतीही लोकांमध्ये आहे. कारण गॅसच्या किंमती वाढल्या तर सर्वसामान्यांचं बजेट हलणार आहे. आधीच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. पण आता एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे. संस्थेने तर्क लावलाय की, अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. ज्यामुळे किंमती वाढल्या आहेत. टॅक्स हटवल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
एलपीजी सिलेंडर रेट्स
एलपीजी सिलेंडर रेट्स
advertisement

सध्या टॅक्सचं गणित कसंय?

सर्व एलपीजी सिलेंडरवर 5% जीएसटी वसूल केला जातो. तर कमर्शियल सिलेंडरवर हे दर 18% आहे. तसंच पाइपच्या माध्यमातून येणारा घरगुती गॅस म्हणजेच पीएनजीवर सध्या जीएसटी लावला जात नाही. मात्र राज्य सरकार यावर 3% ते 14.5% पर्यंत व्हॅट वसूल करते. ज्यामुळे किंमती आणखी वाढतात.

Gas Cylinder Booking: घरात गॅस सिलेंडर ठेवणाऱ्यांनो आधी हे वाचा! केंद्र सरकारने बुकिंगसाठी लागू केले नियम

advertisement

घरगुती सिलेंडवर बचत किती होईल?

सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर लावला जाणारा 5% जीएसटी कमी केला तर ग्राहकांची थेट बचत होईल. म्हणजेच 913 रुपयांचा घरगुती सिलेंडर जवळपास 43 रुपयांनी स्वस्त होईल. ज्यामुळे या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती 869.52 रुपये होतील. हे लहान कुटुंबाच्या मासिक बजेटला संतुलित ठेवण्यात खुप मदत करेल.

सर्वात मोठा दिलासा व्यापाऱ्यांना मिळेल 

advertisement

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलो कमर्शियल सिलेंडररवर 18% जीएसटी लावला जातो. सध्या या गॅस सिलेंडरच्या किंमती 2078.50 रुपये आहे. टॅक्स हटवल्यावर याच्या किंमती या तब्बल 317 रुपयांनी कमी होऊ शकतील. ज्यामुळे हे सिलेंडर तुम्ही फक्त 1761.44 रुपयांत खरेदी करू शकता. यामुळे खाद्य पदार्थांच्या किंमतीतही कमतरता येऊ शकते.

पीएनजीवर व्हॅट हटवण्याचा दबाव 

advertisement

सीटीआयने पीएनजीवर लावल्या जाणारा व्हॅट पूर्णपणे बंद करावा असा प्रस्ताव ठेवलाय. पीएनजी राज्याच्या अधिपत्याखाली आहे. यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. व्हॅट हटवल्याने पाइपमधून येणारा गॅस स्वस्त होईल. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना पीएनजी गॅस स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल.

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? अमेरिका-इराणमध्ये सीझफायरचा मोठा निर्णय; कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

advertisement

जागतिक संकट आणि वाढती मागणी 

सीटीआयच्या पदाधिकाऱ्यांनुसार, पश्चिम आशियात वाढत्या संघर्षाने जगभरात तेल आणि गॅसचं संकट निर्माण केलंय. हा तणाव असुनही भारतात एलपीजी आणि पीएनजीची मागणी विक्रमी स्तरावर आहे. मागणी आणि पुरवठा यातील असंतुलन पाहता टॅक्समध्ये कपात करावी अशी मागणी केली जातेय.

मराठी बातम्या/मनी/
LPG सिलेंडर स्वस्त होणार हो! एका झटक्यात 327 रुपयांनी कमी होऊ शकतो भाव, तुम्हाला कधी मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल