Sunetra Pawar Property: ट्रॅक्टरचा ताफा आणि कोटींची शेतजमीन...शरद पवारांपेक्षा सूनबाई वरचढ! सुनेत्रा पवारांच्या नावावर किती संपत्ती?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sunetra Pawar Property : बारामतीवर दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या पवार कुटुंबाच्या श्रीमंतीचे अनेक किस्से चर्चिले जातात, पण आता निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधून या संपत्तीचे अधिकृत आणि थक्क करणारे आकडे समोर आले आहेत
बारामती: राज्याच्या राजकारणात बारामती आणि पवार कुटुंबाचे नाव नेहमीच चर्चेत असते. बारामतीवर दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या पवार कुटुंबाच्या श्रीमंतीचे अनेक किस्से चर्चिले जातात, पण आता निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधून या संपत्तीचे अधिकृत आणि थक्क करणारे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा त्यांच्या सूनबाई सुनेत्रा पवार या दुप्पट श्रीमंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सुप्रिया सुळे या कुटुंबात सर्वात 'धनाढ्य' असल्याचे समोर आले आहे.
सुनेत्रा पवारांची संपत्ती किती?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. तर, दुसरीकडे बारामतील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभा निवडणूक आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, शरद पवार यांची एकूण संपत्ती सुमारे ६१ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. याउलट, सुनेत्रा पवार यांची (दिवंगत पती अजित पवार आणि कुटुंबासह) एकत्रित संपत्ती सुमारे १२१.७९ कोटी रुपये इतकी आहे. यात सुनेत्रा पवारांची खरी ताकद त्यांच्या जमिनींमध्ये दिसून येते. त्यांच्याकडे ६७.६७ कोटींची स्वतःची स्थावर मालमत्ता असून, बारामतीतील मौल्यवान शेतजमीन आणि व्यावसायिक इमारतींचा यात मोठा वाटा आहे.
advertisement
सुनेत्रा पवारांकडे ट्रॅक्टरचा ताफा, शरद पवारांकडे काय?
सुनेत्रा पवार यांच्याकडे टोयोटा कॅमरी (२७.६५ लाख), इनोव्हा (३८.३९ लाख), ५-६ ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स आहेत. त्यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य २३.२५ कोटी रु. आहे. तर, १६.५३ कोटींचे कर्जही आहे.
तर, ८६ वर्षीय शरद पवारांनी जमिनीपेक्षा शेअर्स आणि मुदत ठेवीत जास्त गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे.शरद पवार यांच्याकडे ४४.७१ कोटी रुपयांची 'जंगम' मालमत्ता आहे. पत्नी प्रतिभा यांच्या नावे २७.७७ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. पवारांवर ४९ लाखांचे कर्ज आहे.
advertisement
दरम्यान, पवार कुटुंबामध्ये खासदार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत. सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती १६७ कोटी रुपये असून त्या वडील आणि वहिनींपेक्षाही श्रीमंत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar Property: ट्रॅक्टरचा ताफा आणि कोटींची शेतजमीन...शरद पवारांपेक्षा सूनबाई वरचढ! सुनेत्रा पवारांच्या नावावर किती संपत्ती?










