advertisement

आता सरकारकडून तुम्हालाही दरमहा मिळणार ३,००० रु, त्यासाठी पात्रता काय? अर्ज कुठे कराल?

Last Updated:

PM-SYM Yojana : देशभरात आजही मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांकडे स्थिर नोकरी नाही. त्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक असुरक्षितता जाणवते.

Sarkari Yojana
Sarkari Yojana
मुंबई : देशभरात आजही मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांकडे स्थिर नोकरी नाही. त्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक असुरक्षितता जाणवते. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपयांचे निश्चित पेन्शन मिळते.
योजनेचा उद्देश काय?
असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नियमित उत्पन्न नसलेल्या कामगारांसाठी ही योजना सुरक्षित भविष्याची हमी देते.
किती पेन्शन मिळते?
या योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन दिले जाते. यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या वयानुसार दरमहा काही रक्कम भरावी लागते. उदाहरणार्थ, १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात.
advertisement
पात्रता अटी काय आहेत?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत जसे की,  वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपर्यंत असावे.  Employees' Provident Fund Organisation (EPFO) किंवा Employees' State Insurance Corporation (ESIC) चे सदस्य नसावे.
कोण घेऊ शकतो लाभ?
ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. यामध्ये पथविक्रेते, रिक्षाचालक, घरगुती कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, मेकॅनिक, कचरा वेचणारे, हातमाग कामगार, चामड्याचे काम करणारे आणि विडी कामगार यांचा समावेश होतो.
advertisement
आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. जसे की,  आधार कार्ड
बचत बँक खात्याचे पासबुक, ऑटो-डेबिटसाठी संमतीपत्र
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जवळच्या Common Service Center (CSC) केंद्राला भेट देता येते. तसेच Life Insurance Corporation of India (LIC), EPFO किंवा ESIC कार्यालयांमार्फतही नोंदणी करता येते.
सुरक्षित भविष्याची हमी
प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. नियमित थोडी बचत करून भविष्यात निश्चित पेन्शन मिळवण्याची ही एक प्रभावी संधी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आता सरकारकडून तुम्हालाही दरमहा मिळणार ३,००० रु, त्यासाठी पात्रता काय? अर्ज कुठे कराल?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement