दुर्गंधी विसरा! ठाणे पालिकेचा मास्टर प्लॅन; हिरानंदानीत नाल्यावर आता गाड्या चार्ज होणार
Last Updated:
Thane News : ठाण्यातील हिरानंदानी मेडोजमधील उघड्या नाल्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. या नाल्यावर स्लॅब टाकून पीपीपी तत्त्वावर नवा प्रकल्प उभारला जाणार असून यामुळे आरोग्य जपले जाईल आणि पालिकेच्या पैशांचीही बचत होईल.
ठाणे : सकाळची सुरुवात असो वा रात्रीची शांत झोप ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील नागरिकांसाठी गेल्या काही दिवसांपासून हे कठिण ठरत होते. कारण फक्त होते की घराशेजारुन वाहणारा तो उघडा नाला. मात्र आता या मोठ्या समस्येवर पालिकेने एक कायमचा भन्नाट तोडगा काढला आहे. हा नाला आता पूर्णपणे बंदिस्त केला जाणार असून आता त्यावर चक्क इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.
नेमकी अडचण काय होती?
या हिरानंदानी मेडोज परिसरात साधारण 300 फुट लांबाची एक उघडा नाला आहे. या नाल्यामध्ये दरवेळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी हे सोडले जाते. या उघड्या नाल्यामुळे परिसरात प्रचंड घाण तसेच दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे त्या डासांचा प्रादुर्भाव आणि उग्र वास परिसरात येत असल्या कारणांमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत होता.
advertisement
हा उपाय काढला?
तेथील नागरिकांनी या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार केळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जावून त्या जागेची पाहणी केली. त्यात त्यांनी केवळ हा नाला झाकून न थांबवता ज्या जागेचा वापर कसा करता येईल त्यावर ही एक चांगली आयडीया सुचवली. त्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की या नाल्यावर स्लॅब टाकून तिथे ई-व्ही चार्चिंग स्टेशन उभारावे.
advertisement
नेमका काय होईल फायदा?
1)नाला बंदिस्त झाल्यामुळे परिसरातील दुर्गंधी कायमची थांबेल परिणामी रहिवाशांचे आरोग्य सुधारेल.
2)ई-व्ही चार्जिंग स्टेशनमुळे पर्यायी इंधनालाही चालना मिळेल आणि प्रदुषण कमी होईल.
3)हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवला जाणार आहे असून या वर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 10:10 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
दुर्गंधी विसरा! ठाणे पालिकेचा मास्टर प्लॅन; हिरानंदानीत नाल्यावर आता गाड्या चार्ज होणार







