खरात प्रकरणात नवा ट्विस्ट, अवघ्या 20 रुपयांसाठी व्हायरल झाले अश्लील VIDEO, धक्कादायक माहिती समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आतापर्यंत अशोक खरातचे एकूण १७ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ अवघ्या २० ते ५० रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Latest News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत अशोक खरातचे एकूण १७ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ अवघ्या २० ते ५० रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
अशोक खरात आणि काही पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर सेलने अधिकृतपणे एफआयआर (FIR) दाखल केली आहे. आयटी (IT) कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या कारवाईमुळे संबंधित संशयितांचे धाबे दणाणले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
15 ते 17 अश्लील व्हिडीओ व्हायरल
advertisement
तपासादरम्यान, सायबर सेलच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात यांच्याशी संबंधित सुमारे १५ ते १७ आक्षेपार्ह व्हिडिओ फेसबूक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि काही पोर्न साइट्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी सायबर सेलने व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या चार प्रमुख सोशल मीडिया अकाऊंट विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
20 ते 50 रुपयांना विकला व्हिडीओ
advertisement
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे अश्लील व्हिडिओ अवघ्या २० ते ५० रुपयांमध्ये विकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे व्हिडीओ पाहण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून २० ते ५० रुपये प्रति व्हिडिओ अशी रक्कम उकळली जात होती. पैसे भरल्यानंतर संबंधित व्यक्तींना वैयक्तिक अकाऊंटवर हे व्हिडिओ पाठवले जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. याबाबतचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.
advertisement
हे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेक पीडित महिलांची ओळख सार्वजनिक झाली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, पीडितांची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा असून, यातून संबंधित महिलांना मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, "आम्ही एफआयआर दाखल केली असून तपास वेगाने सुरू आहे. सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू असून, या प्रकरणात सामील असलेल्या आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील."
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 8:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट, अवघ्या 20 रुपयांसाठी व्हायरल झाले अश्लील VIDEO, धक्कादायक माहिती समोर









