advertisement

म्हाडा कॉलनीत थरार! सफाई काम करतानाच ओढवला प्रसंग, पण पुढं घडलं ते पाहून अंगावर काटा येईल

Last Updated:

Bhiwandi News : भिवंडी शहरातून एका सफाई कामगारासोबत एक अशी घटना घडली आहे,ज्याचा त्याने कधीचा विचार ही नव्हता केला. मात्र पुढं या घटनेतं असं काही घडतं की सर्वांनी दिलासा व्यक्त केला आहे.

वाहनाने वायर ओढली आणि खांब थेट सफाई कामगाराच्या डोक्यात
वाहनाने वायर ओढली आणि खांब थेट सफाई कामगाराच्या डोक्यात
ठाणे : भिवंडीमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सफाईचे काम करत असताना अचानकच रस्त्यावर असलेला लोखंडी वीजखांब अंगावर पडल्याने महापालिकाचा कर्मचारी गंभीर जखमी झालेला आहे. सुदैवाने म्हणजे त्या वेळी असलेल्या परिसरातील लोकांच्या प्रसंगावधानामुळे या कर्मचाऱ्याचे प्राण वाचले आहे.
सफाई कामगाराचा थरारक अपघात
भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती 5 अंतर्गत म्हाडा कॉलनी आहे त्या परिसरातील ही घटना आहे. सफाई कामगार नरेश सग्गम हे नेहमीप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रस्ताची साफसफाई करत होते. त्या दरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वाहनात वीजखांबाची लोंबकळणारी वायर अडकली होती. त्यातच वाहनाचा वेग असल्याने वायरला जोरदार हिसका बसला आणि तो गंजलेला खांब थेट नरेश यांच्या डोक्यावर कोसळला.
advertisement
तातडीने उपचार सुरु
तो थांब नरेश यांच्यावर पडताच ते गंभीर जखमी झाले. नंतर तिथं असलेल्या नागरिकांनी आणि त्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी तातडीने त्यांनी उचलले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
म्हाडा कॉलनीत थरार! सफाई काम करतानाच ओढवला प्रसंग, पण पुढं घडलं ते पाहून अंगावर काटा येईल
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement