'नही झुकेगा...' अमेरिकेसमोर इराणची भूमिका, 10 मुद्द्यांचा प्रस्ताव, चौथ्या मुद्द्यावर ठरणार कोण जिंकणार युद्ध?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इराण अमेरिका तणावात पाकिस्तानच्या मध्यस्थीने १४ दिवसांचा युद्धविराम, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, होर्मुझ मार्ग खुला, इराणचा १० कलमी अजेंडा पुढे.
इराण अमेरिका युद्ध संघर्षामुळे जगाचं टेन्शन वाढलं होतं. शेअर मार्केट अस्थिर होतं, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं होतं. LPG चा तुटवडा होता, पेट्रोल डिझेलच्या किंमती चार मुख्य शहरांत स्थिर होत्या मात्र भारतात काही कमी अधिक प्रमाणात वाढत होत्या. या सगळ्याला आता तूर्तास विराम मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं सीझफायरची घोषणा केली आहे. तर इराणने देखील या निर्णयाला दुजोरा दिला मात्र 10 मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दोन्ही देशांनी ठेवली आहे.
10 एप्रिल रोजी इराण आणि अमेरिका यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या चर्चेतील होर्मुझ हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. इराणने युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी होर्मुझवर टोल आकारणार असल्याचं सांगितलं होतं. दोन्ही देशांच्या चर्चेत काय महत्त्वपूर्ण निर्णय होणार ते पाहावं लागणार आहे. कोणते १० मुद्दे आहेत ज्यावर ही चर्चा होणार आहे ते समजून घेऊया.
advertisement
मिडल ईस्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रक्ताळलेल्या संघर्षाला अखेर तात्पुरता पूर्णविराम मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची अधिकृत घोषणा केली असून, इराणनेही याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांनी मांडलेला प्रस्ताव दोन्ही देशांनी स्वीकारला आहे. या करारानुसार, पुढील १४ दिवस लढाई थांबवली जाईल आणि जगासाठी महत्त्वाचा असलेला स्ट्रॅट ऑफ होर्मुज हा समुद्री मार्ग तातडीने खुला केला जाईल.
advertisement
धमकी ते समझोता ट्रम्प यांचा यू-टर्न?
काही तासांपूर्वीच "इराणने करार केला नाही तर त्यांची सभ्यताच नष्ट करू," असा इशारा देणाऱ्या ट्रम्प यांनी अचानक शांततेचा मार्ग स्वीकारल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने दिलेल्या प्रस्तावात दोन आठवडे युद्ध थांबवून चर्चा करण्याचं सुचवलं होतं, ते त्यांनी मान्य केलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही या 'तात्पुरत्या तहावर' शिक्कामोर्तब केलं आहे.
advertisement
इराणचा १० कलमी अजेंडा: अटी मान्य तरच शांतता!
हा युद्धविराम जरी दोन आठवड्यांचा असला, तर भविष्यातील कायमस्वरूपी शांततेसाठी इराणने अमेरिकेसमोर १० अटींचा डोंगर उभा केला आहे. या अटींवर चर्चा करण्यास ट्रम्प तयार झाले आहेत
advertisement
१. इराक, लेबनान आणि येमेनविरुद्ध सुरू असलेलं युद्ध पूर्णपणे थांबवणे.
२. इराणविरुद्धचं युद्ध कायमस्वरूपी आणि कोणत्याही अटीशिवाय संपवणं.
३. संपूर्ण क्षेत्रातील सर्व प्रकारचे लष्करी संघर्ष थांबवणे.
४. स्ट्रॅट ऑफ होर्मुझ समुद्री मार्ग पुन्हा खुला करणे.
५. या समुद्री मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेसाठी नवीन नियम आणि अटी लागू करणे.
६. युद्धात इराणचं जे नुकसान झालंय, त्याची संपूर्ण भरपाई अमेरिकेने द्यावी.
advertisement
७. इराणवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध मागे घ्यावेत.
८. अमेरिकेने जप्त केलेली इराणची सर्व मालमत्ता आणि पैसा त्वरित परत करावी.
९. इराण कोणत्याही प्रकारचे अण्वस्त्र बनवणार नाही, याची लेखी खात्री द्यावी.
१०. वरील सर्व अटी मान्य होताच सर्व आघाड्यांवर तात्काळ युद्धविराम लागू केला जाणार आहे.
पुढील १४ दिवस अत्यंत महत्त्वाचे
advertisement
हे दोन आठवडे केवळ युद्ध थांबवण्यासाठी नसून, इराणने मांडलेल्या या १० अटींवर अमेरिका किती प्रमाणात लवचिकता दाखवते, यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे. होर्मुझ मार्ग उघडल्यामुळे जागतिक बाजाराला तर दिलासा मिळेलच, पण या १४ दिवसांत जर चर्चा फिस्कटली, तर पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची भीती कायम आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 8:25 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
'नही झुकेगा...' अमेरिकेसमोर इराणची भूमिका, 10 मुद्द्यांचा प्रस्ताव, चौथ्या मुद्द्यावर ठरणार कोण जिंकणार युद्ध?








