advertisement

कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूममध्ये 'CCTV'; महिलेला कपडे बदलण्यासाठी आत पाठवलं अन्..पुण्यात दुकानदाराचं खळबळजनक कृत्य

Last Updated:

महिला कपडे खरेदी करण्यासाठी मुकेश मुथा याच्या दुकानात गेली होती. यावेळी मुथाने तिला दुकानातील स्टोअर रूममध्ये कपडे बदलण्यासाठी पाठवले.

कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूममध्ये 'CCTV'; (प्रतिकात्मक फोटो)
कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूममध्ये 'CCTV'; (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याच्या धक्क्यादायक प्रकारामुळे कामशेत परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी "मुकेश फॅन्सी कॉर्नर" या दुकानाचा मालक मुकेश मुथा (रा. कामशेत) याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कपडे खरेदी करण्यासाठी मुकेश मुथा याच्या दुकानात गेली होती. यावेळी मुथाने तिला दुकानातील स्टोअर रूममध्ये कपडे बदलण्यासाठी पाठवले. मात्र, त्या स्टोअर रूममध्ये आधीच सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. या माध्यमातून पीडितेच्या खासगीपणाचा भंग करून, तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच कामशेत परिसरात संतापाची लाट उसळली आहे. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी मुकेश मुथा याला अटक केली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधम दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
advertisement
कामशेत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूममध्ये 'CCTV'; महिलेला कपडे बदलण्यासाठी आत पाठवलं अन्..पुण्यात दुकानदाराचं खळबळजनक कृत्य
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement