advertisement

RR vs MI : पावसामुळे TV बंद करून झोपला असाल पण रियान परागने पहिल्या 3 ओव्हरमध्येच कसा गेला मुंबईचा गेम? पाहा

Last Updated:

Mumbai indians vs Rajasthan royals : कागदावर कमकुवत वाटणारी राजस्थानची टीम पूर्ण बॅकअप प्लॅनसह मैदानात उतरली होती. वैभव आणि यशस्वीच्या अफलातून खेळीमुळे राजस्थानने 11 ओव्हरमध्ये 150 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

Why Mumbai Indians loss Against RR First 3 over Change game riyan parag
Why Mumbai Indians loss Against RR First 3 over Change game riyan parag
Mumbai indians Loss Reason : पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच गुवाहाटीच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरली अन् यजमान राजस्थान रॉयल्सने पलटणचा चांगलाच समाचार घेतला. मुंबई इंडियन्स राजस्थानला कडवी टक्कर देऊल, असं चित्र समोर येत असताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबईच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं. 15 वर्षाच्या वैभवने जगातील नंबर 1 बॉलर असलेल्या बुमराहवर वार केले अन् त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये दोन सिक्स मारून आपल्या आंतरराष्ट्रीय आगमनावर रणशिंग फुंकलं आहे. पहिल्यांदाच दोन्ही स्टार खेळाडू आमनेसामने आले होते. तर दुसरीकडे रियान परागची स्मार्ट कॅप्टन्सी दिसून आली.
advertisement

पहिल्या तीन ओव्हरमध्येच पलटणचा गेम

कागदावर कमकुवत वाटणारी राजस्थानची टीम पूर्ण बॅकअप प्लॅनसह मैदानात उतरली होती. वैभव आणि यशस्वीच्या अफलातून खेळीमुळे राजस्थानने 11 ओव्हरमध्ये 150 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यामुळे मुंबईवर मोठे प्रेशर दिसून येत होतं. त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या तीन ओव्हरमध्येच पलटणचा गेम झाला. अपेक्षेप्रमाणे रियानने आर्चरला पहिली ओव्हर दिली अन् आर्चरने आपलं काम चोखपणे बजावलं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आर्चरने रिकल्टनला माघारी पाठवलं अन् पहिला ठोका वाजला.
advertisement

सूर्याला फेरवेट शॉटमध्ये अडकवलं

त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्या मैदानात येताना पाहून रियानने लगेच प्लॅन चेंज केला अन् आंद्रे बर्गर याला बॉल सोपवला. बर्गर याने सूर्याला त्याच्या फेरवेट शॉटमध्ये अडकवला. डीप बॅक स्वेअर लेगवर सूर्याने कॅच सोपवला. त्यामुळे मुंबईला आता दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्या होत्या. दुसरा ठोका पडला पण राजस्थानसाठी सर्वात मोठी अडचण होती, मुंबईच्या मॅचविनरची... रोहित शर्मा अजूनही मैदानात होता. त्याचवेळी रियानने हुकमी एक्का काढला.
advertisement
advertisement

हिटमॅनने 12 मॅचमध्ये 5 वेळा आऊट

रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असताना रिस्क घेऊन रियान परागने असा बॉलर आणला ज्याने हिटमॅनने 12 मॅचमध्ये 5 वेळा आऊट करून दाखवलं होतं. रोहित शर्मा त्याच्यासमोर तसाच अडखळतो, जसा तो डेल स्टेनसमोर गडबडला होता. रियान परागने संदीप शर्माला बॉलिंग दिली. संदीपचा रेकॉर्ड रोहितसमोर तगडा, त्यामुळे रोहितने देखील हळूच खेळण्याचं ठरवलं. पण संदीपच्या एका स्लोअर बॉलवर हिटमॅन फसला. रोहित शर्मा स्विप शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण बॉल बॅटला लागलाच नाही. अशाप्रकारने संदीप शर्माने सहाव्यांदा रोहित शर्माची विकेट काढली.
advertisement

मुंबईचं मनोबल तोडलं अन् मॅच जिंकली

दरम्यान, पहिल्या तीन विकेट गेल्यानंतर मुंबई कोलमडून गेली. त्यानंतर रवी बिश्नोईने हार्दिक आणि तिलकला माघारी पाठवल्यानंतर रदरफोर्ट देखील जास्त काही करू शकला नाही. पहिल्या तीन ओव्हरमध्ये राजस्थानने मुंबईचं मनोबल तोडलं अन् मुंबईने हातातली मॅच गमावली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RR vs MI : पावसामुळे TV बंद करून झोपला असाल पण रियान परागने पहिल्या 3 ओव्हरमध्येच कसा गेला मुंबईचा गेम? पाहा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement