EMI किती कमी होणार?
बँकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, जर कोणी 25 लाख रुपयांचा होम लोन 20 वर्षांसाठी घेतला असेल आणि त्यातील 3 वर्षांची EMI भरून झाला असेल तर आधीचं व्याजदक 8.70 टक्के होतं आता नवीन व्याजदर 8.65 टक्के असणार आहे. या बदलामुळे जुन्या दराने महिन्याचा EMI साधारण 22,055 रुपये भरावा लागत होता तो आता ती थोडा कमी होऊन 21,987 रुपये भरावा लागेल. म्हणजेच दरमहा 68 रुपयांचा फरक पडेल.
advertisement
तसं पाहायला गेलं तर म्हणाल 68 रुपये म्हणजे फारच कमी झाले. पण पुढची संपूर्ण 17 वर्षे हा दर कायम राहिला तर ग्राहकाला सुमारे 13,800 रुपयांची बचत होते. EMI थोडाशी कमी झाल्याने दरमहा खिशात थोडी जास्त रक्कम उरणार आणि त्याचा उपयोग कुटुंबाच्या इतर खर्चासाठी करता येईल. MCLR म्हणजे बँक आपल्या ग्राहकांना लोन देण्यासाठी ठरवणारा किमान व्याजदर. तो दर कमी झाला की थेट EMIवर परिणाम होतो. HDFC बँकेने 6 महिने आणि 1 वर्षांच्या MCLR मध्ये बदल केला असून आता हा दर 8.65% आहे.
असं म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे ही छोटी बचत देखील अडचणीच्या काळात खूप मोठी वाटते. EMI कमी झाला की खर्चाचा ताण हलका होतो. विशेषतः नवरात्र आणि दिवाळीच्या काळात खरेदी करण्यास कुटुंबासाठी मोठा हातभार लागतो. HDFC बँकेचा हा निर्णय फक्त आकड्यांपुरता नाही. EMI हलकी झाल्यामुळे हजारो कुटुंबांच्या खिशावरचा ताण थोडा कमी होणार आहे. छोटासा बदल दीर्घकाळात मोठी बचत करून देऊ शकतो.