TRENDING:

तुमचंही आहे HDFC बँकेत खातं? ग्राहकांसाठी बंद होतेय ही महत्त्वाची सेवा

Last Updated:

तुमचं बँक अकाउंट प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेकडून ग्राहकांना दिली जाणारी एक प्रमुख सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement
मुंबई : बँक खात्यात पैसे भरले किंवा काढले, एखादं पेमेंट केलं की त्याबाबतचा एसएमएस आपल्याला येतो. अनेकदा आपलं ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्या क्षणीच असा एसएमएस येतो. तो आपल्या सवयीचाही झाला आहे. त्यामुळे एसएमएस नाही आला तर ट्रान्झॅक्शनमध्ये काही चुकलंय का अशी शंकाही येते. पण तुमचं बँक अकाउंट प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेकडून ग्राहकांना दिली जाणारी एक प्रमुख सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच बँकेने त्याबाबत माहिती दिली आहे.
एचडीएफसी
एचडीएफसी
advertisement

25 जून 2024 पासून 100 रुपयांपेक्षा कमी यूपीआय ट्रान्झॅक्शन आणि 500 रुपयांपेक्षा कमी डिपॉझिटसाठी एसएमएस अलर्ट न पाठवण्याचा निर्णय बँकेकडून घेण्यात आला आहे. ईमेल द्वारे नोटिफिकेशन ग्राहकांना मिळतील मात्र एसएमएस पाठवला जाणार नाही. ईमेल नोटिफिकेशनसाठी ग्राहकांनी आपला ईमेल आयडी अपडेट करावा अशी सूचनाही बँकेकडून करण्यात आली आहे.

sanjiv bhasin: शेअर मार्केटमध्ये नवा हर्षद मेहता स्कॅम? टीव्हीवर लोकांना द्यायचे शेअर विकत घेण्याचा सल्ला, नंतर करायचे 'गेम'

advertisement

तुमचं एचडीएफसी बँकेत खातं असेल आणि तुमचा ईमेल आयडी बँक खात्याला जोडलेला नसेल तर तो अपडेट करुन तुम्ही ईमेल नोटिफिकेशन प्राप्त करु शकता. त्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं आणि ईमेल आयडी अपडेट करावा, असं बँकेकडून कळवण्यात आलं आहे. ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी सर्वात आधी https://www.hdfcbank.com/ या वेबसाईटवर जा. त्यानंतर Insta Service ऑप्शन वर क्लिक करा. आता मेनूवर स्क्रोल डाउन करत Update Email ID हा ऑप्शन निवडा. तिथे Let’s Begin वर क्लिक करा. आता बँक खात्याशी जोडलेला तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर जन्मतारीख, पॅन किंवा कस्टमर आयडी व्हेरिफाय करा. आता Get OTP वर क्लिक करा. मिळालेला OTP टाकून पुढे सांगितलेली प्रक्रिया करुन ईमेल आयडी अपडेट करा. यूपीआय ही एक रिअल टाईम पेमेंट सिस्टिम आहे. भारतात 2016 मध्ये तिचा वापर सुरु झाला. ही सिस्टिम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून संचालित केली जाते.

advertisement

एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रामधील एक महत्त्वाची बँक म्हणून ओळखली जाते. बँकेकडून ग्राहकांना नेट बँकिंग, फोन बँकिंगसारख्या महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात.

मराठी बातम्या/मनी/
तुमचंही आहे HDFC बँकेत खातं? ग्राहकांसाठी बंद होतेय ही महत्त्वाची सेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल