TRENDING:

मंदीत संधी! Mutual Funds मध्ये गुंतवणुकीची हीच ती वेळ, मिळू शकतो दमदार रिटर्न

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार त्रस्त असताना दुसरीकडे HDFC म्युचुअल फंडने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे.

advertisement
कोल्हापूर : भारतातील प्रमुख म्युच्युअल फंड हाउसपैकी एक असणारे HDFC म्युच्युअल फंडाने शेअर बाजारातील घसरणीच्या प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी आश्चर्यकारक परतावा मिळवला असून, या फंडाच्या योजनेने त्यांचे पोर्टफोलिओ मजबूत केले आहे.
News18
News18
advertisement

HDFC BSE Sensex Index Fund चा दमदार परतावा

HDFC BSE Sensex Index Fund ने 5 वर्षांच्या कालावधीत 17.52 टक्के चा वार्षिक (CAGR) परतावा दिला आहे. म्हणजेच, जरी बाजारातील घसरण झाली असली तरी या फंडाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. एका वर्षात या फंडाचा परतावा साधारणपणे 2.25 टक्के आहे, जो शेअर बाजारातील उतार-चढावांनुसार चांगला ठरतो. HDFC म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणुकीचे प्रमुख क्षेत्र म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि अन्य मोठ्या कंपन्या. या कंपन्यांच्या सामाईक योगदानामुळे फंडाला सातत्यपूर्ण आणि स्थिर परतावा मिळाला आहे.

advertisement

पुणेकरांसाठी खास समर कलेक्शन, 20 प्रकारच्या कॉटन कुर्ती, कुठे मिळतात पाहा VIDEO

SIP ने दिला फायदा

या फंडाने SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मार्गे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना विशेषत: फायदा दिला आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 3,000 रुपयांची SIP सुरू केली असती, तर आज त्यांची गुंतवणूक 2.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असती.

advertisement

..तर मिळाला असते दीड कोटी  

या योजनेने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. HDFC म्युच्युअल फंडाच्या या योजनेने अलीकडेच अनेक गुंतवणूकदारांना आपल्या संपत्तीची लक्षणीय वाढ अनुभवता आली. जर एक गुंतवणूकदार 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची रक्कम 1.50 कोटी रुपयांपर्यंत वाढली असती.

HDFC म्युच्युअल फंडाचा पद्धतशीर दृष्टिकोन

advertisement

HDFC म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांसाठी पद्धतशीर आणि सततचा परतावा देण्यावर भर देतो. जरी बाजारातील परिस्थिती अनिश्चित असली तरी, या फंडाने आपल्या धोरणांवर ठाम राहून मार्केटच्या चढ-उतारांमध्येही सकारात्मक रिटर्न दिला आहे. HDFC म्युच्युअल फंडाच्या योजनेने हे सिद्ध केले आहे की दीर्घकालीन गुंतवणूक आणि SIP चा वापर करून बाजारातील उतार-चढावांचा सामना केला जाऊ शकतो. तसेच, या फंडाचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि गुंतवणूक धोरण देखील गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले आहेत. ह्या फंडाने आपला स्थिर रिटर्न देत, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओची मजबुती वाढवली आहे.

advertisement

Disclaimer: (इथं दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जोखिमेचं आहे. विशेषतः F&O सेगमेंटमध्ये ट्रेडिंग खूप जोखिमयुक्त असते. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

मराठी बातम्या/मनी/
मंदीत संधी! Mutual Funds मध्ये गुंतवणुकीची हीच ती वेळ, मिळू शकतो दमदार रिटर्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल