आधार EPFO सोबत लिंक करण्याची आणि ELI चा लाभ घेण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ही डेडलाइन 15 फेब्रुवारी 2025 होती. ज्यांनी अजूनही UAN अॅक्टिव्ह केलेला नाही आणि बँक खाते लिंक केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
EPFO मेंबर पोर्टलला भेट द्या – EPFO Member Portal
advertisement
"अॅक्टिवेट UAN" लिंकवर क्लिक करा.
तुमचा UAN क्रमांक, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर भरा.
तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक केलेला आहे याची खात्री करा.
आधार OTP व्हेरिफिकेशनसाठी सहमती द्या.
"Get Authorization Pin" वर क्लिक करा आणि आलेला OTP भरा.
OTP यशस्वीरीत्या भरल्यानंतर, तुमचा UAN सक्रिय होईल आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक पासवर्ड पाठवला जाईल.
UAN सक्रिय झाल्यानंतर मिळणारे फायदे:
एकदा UAN सक्रिय झाल्यानंतर, EPFO च्या विविध ऑनलाइन सेवांचा तुम्ही घरबसल्या लाभ घेऊ शकता:
उमंग अॅपद्वारे UAN कसा अॅक्टिवेट करायचा?
अँड्रॉइड प्ले स्टोअर किंवा आयओएस अॅप स्टोअर वरून उमंग अॅप डाउनलोड करा.
अॅप उघडल्यानंतर, 'सर्व सेवा' वर जा.
'EPFO' पर्याय निवडा.
'EPFO सेवा' मध्ये 'UAN सक्रियकरण' पर्याय निवडा.
'श्रेणी' पर्यायामध्ये 'UAN' निवडा.
जो UAN नंबर सक्रिय करायचा आहे तो एंटर करा.
तुमचे पूर्ण नाव आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एंटर करा.
'ओटीपी मिळवा' बटणावर क्लिक करा.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा.
घोषणेवर क्लिक करा.
'सबमिट' बटणावर क्लिक करा.
PF बॅलन्स तपासणे
PF पासबुक डाउनलोड करणे
ऑनलाइन क्लेम सबमिट करणे (अॅडव्हान्स/विथड्रॉल/ट्रान्सफर)
वैयक्तिक माहिती अपडेट करणे
रिअल-टाइम क्लेम मॉनिटरिंग
ऑनलाइन आधार लिंकिंग आणि इतर सुविधा
डेडलाइन न चुकवता काम पूर्ण करा!
जर तुम्ही दिलेल्या 15 मार्च 2025 पर्यंत तुमचा UAN सक्रिय केला नाही आणि बँक खाते आधारशी लिंक केले नाही, तर तुम्हाला ELI स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा चुकवू नका.
