पॅन कार्ड होल्डर्सना अधिकृत सर्व्हिस पुरवणारे NSDL किंवा UTI इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (UTIITSL) याच्याद्वारे त्यांच्या कार्डच्या रिप्रिंटसाठी अर्ज करू शकतात. रिप्रिंट केलेल्या कार्डमध्ये करदात्यांचे डिटेल्स असलेला QR कोड असेल. रिप्रिंट केलेलं कार्ड करदात्याच्या रजिस्टर्ड ई मेलवर डिजिटली पाठवलं जाईल.
बचत खात्यात किती पैसे ठेवावेत? यापेक्षा जास्त व्यवहार करू नका, अन्यथा आयकर विभागाची येईल नोटीस
advertisement
पॅन कार्ड क्यूआर कोडने रिप्रिंट कसं करायचं?
- NSDL वेबसाइटवरून पॅन कार्ड मिळवण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html या वेबसाईटवर जा.
- तुमचा पॅन, आधार क्रमांक आणि जन्मतारीख एंटर करा.
- रिलेव्हंट चेकबॉक्स टिक करा आणि सबमिटवर क्लिक करा.
- नवीन पेजवर तुमचे डिटेल्स रिव्ह्यू करा.
- तुम्हाला फोन नंबर, ई मेल आयडी की दोन्हीवर ओटीपी हवाय तो ऑप्शन सिलेक्ट करा.
- इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रेकॉर्डमधील पत्त्यावर पॅन कार्ड पाठवण्यासाठी बॉक्सवर टिक करा.
- क्लिक करून ओटीपी जनरेट करा.
- तुम्ही निवडलेल्या पर्यायावर ओटीपी येईल तो एंटर करा. (ओटीपी 10 मिनिटांसाठी व्हॅलिड असेल)
- तुमचा पेमेंट मोड निवडा आणि पॅन कार्ड क्यूआर कोडने रिप्रिंट करण्यासाठी 50 रुपये भरा.
- त्यानंतर ‘I agree’ वर टिक करा आणि ‘submit’वर क्लिक करा.
- पेमेंट केल्यावर पावती डाउनलोड करून सेव्ह करा.
- 24 तासांनंतर वेबसाइटवरून ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी ही पावती वापरा.
- रिप्रिंट केलेले पॅन कार्ड तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पाठवले जाईल. डिलिव्हरीला साधारणपणे 15–20 दिवस लागतात.
advertisement
advertisement
UTIITSL वरून तुमचे ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा -
- 'reprint PAN card' ऑप्शन निवडा.
- सर्व डिटेल्स भरा.
- तुमचा पर्मनंट अकाउंट नंबर एंटर करा.
- विशिष्ट फॉरमॅटमध्ये तुमची जन्मतारीख भरा.
- स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा सोडवा आणि भरा.
- त्यानंतर ‘सबमिट' बटणवर क्लिक करा.
- पेमेंट इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून फी भरा.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर/ईमेलवर पाठवलेला OTP वापरा आणि व्हॅलिडेट करा.
- यानंतर तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पॅन कार्ड डिस्पॅच होईल.
- तसेच तुमच्या रजिस्टर्ड ई मेल आयडीवर तुम्हाला पॅन कार्डची डिजिटल कॉपी मिळेल.
advertisement
CIBIL Score: तुमचा सिबिल स्कोअर किती? RBI ने नियमात केले बदल, तुमच्यावर होणार परिणाम
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2024 5:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Pan Card Reprint: क्यूआर कोडद्वारे पॅन कार्ड रिप्रिंट कसं करायचं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
