बचत खात्यात किती पैसे ठेवावेत? यापेक्षा जास्त व्यवहार करू नका, अन्यथा आयकर विभागाची येईल नोटीस
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
बचत खात्यात एकूण 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम वर्षभरात जमा किंवा काढल्यास बँकेला आयकर विभागाला ही माहिती द्यावी लागते. 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम ठेवताना PAN अनिवार्य आहे. तसेच 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहार बेकायदेशीर मानला जातो.
जर तुमच्याकडेही बचत खाते असेल आणि तुम्ही त्यात मोठी रक्कम जमा करत असाल किंवा काढत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आयकर विभागाने काही मर्यादा निश्चित केल्या आहेत, ज्या पाळणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्षात (1 एप्रिल ते 31 मार्च) बचत खात्यातून एकूण 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढणे योग्य नाही. जर तुमचा व्यवहार या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर बँक हा व्यवहार आयकर विभागाला कळवते.
आयकर कायद्याच्या कलम 269एसटी नुसार, एका दिवसात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेणे किंवा देणे बेकायदेशीर आहे. एका दिवसात 50000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बचत खात्यात जमा करताना PAN कार्डची माहिती देणे बंधनकारक आहे. जर तुमच्याकडे PAN नसेल, तर फॉर्म 60 किंवा 61 भरून द्यावा लागतो.
advertisement
टॅक्सटुविनचे CEO अभिषेक सोनी सांगतात, “10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली तर ती ‘हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन’ म्हणून ओळखली जाते. बँका किंवा वित्तीय संस्था ही माहिती आयकर विभागाला कलम 114 बी अंतर्गत देतात.”
जर तुम्हाला आयकर विभागाकडून हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनसाठी नोटीस आली, तर तुम्हाकडे पैशाचा स्रोत सिद्ध करणारी कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यात बँक स्टेटमेंट, गुंतवणूक कागदपत्रे, वारसाहक्काचे दस्तऐवज यांचा समावेश असतो. शंका असल्यास अनुभवी कर सल्लागाराशी चर्चा करणे नेहमीच चांगले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2024 4:37 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बचत खात्यात किती पैसे ठेवावेत? यापेक्षा जास्त व्यवहार करू नका, अन्यथा आयकर विभागाची येईल नोटीस