advertisement

Kitchen Tips : वेळेअभावी थेट सायीपासून तूप बनवता? करताय चुक, वेळ वाचेल पण होऊ शकतं मोठं नुकसान!

Last Updated:
disadvantages of making ghee from malai : देशी तूप भारतीय जेवणाचे हृदय आहे. पराठ्यांवर असो, हलव्यामध्ये वापरलेले असो किंवा डाळीत मिसळलेले असो.. तुपाची चव आणि सुगंध संपूर्ण जेवणाची मजा आणखी वाढवते. म्हणून प्रत्येक घरात तूप असतंच. यासाठी बरेच लोक घरी तूप बनवतात. त्यातही बरेच लोक वेळ वाचावा म्हणून थेट सायीपासून तूप बनवतात. पण या कृतीचे अनेक दिवस आहेत. चला पाहूया यामुळे काय नुकसान होऊ शकते.
1/5
तूप बनवण्यासाठी जेव्हा थेट साय वापरली जाते, तेव्हा त्या सायीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि दुधाचे कण असतात. तुम्ही साय थेट गरम करता तेव्हा सर्व पाण्याची वाफ होण्यास जास्त वेळ लागतो आणि जास्त गॅस वापरावा लागतो.

2/5
थेट सायीपासून बनवलेले तूप दुधाच्या कणांनी समृद्ध असते, ज्यामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. तसेच या दुधाच्या कणांमुळे तूपाला वास येऊ शकतो. लोणी बनवून बनवलेले तूप पूर्णपणे शुद्ध असते.

3/5
साय थेट गरम केली तर पॅनच्या तळाशी बरेच काळे किंवा तपकिरी अवशेष जमा होतात. हे जळालेले कण स्वच्छ करणे नंतर खूप अवघड होऊ शकते आणि यातच तुमचा बराचसा वेळ जाऊ शकतो. लोणी काढून तूप बनवल्यास भाडे तितकेसे खराब होत नाही.

4/5
थेट सायीपासून बनवलेले तूप चिकट होते, त्याला रवाळ पोत येत नाही. याउलट कमी आचेवर लोणी शिजवल्याने मिळणारं तूप अधिक रवाळ आणि सुगंधी असते. म्हणूनच तुपाच्या उत्तम अनुभवासाठी आधी थोडी मेहनत घेऊन लोणी बनवा आणि मग त्यापासून तूप.

5/5
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement