अजित पवारांसमोबत 'हा' नेताही विमानाने जाणार होता बारामतीला, पण शेवटच्या क्षणी…
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अजित पवार यांच्यासोबत त्या विमानात राज्यातील अजून एक मोठा नेता मुंबईहून बारामतीसाठी जाणार होता.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विमान अपघाताबद्दल दररोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि संपूर्ण पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली. दरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे.अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. अजित पवार यांच्यासोबत त्या विमानात राज्यातील अजून एक मोठा नेता मुंबईहून बारामतीसाठी जाणार होता.
अजित पवार यांचा विमान अपघात आजही अनेकांसाठी धक्का आहे. विशेष म्हणजे दोघेही एकाच विमानातून प्रवास करणार होते. मात्र, त्यांना पोहोचण्यास उशीर झाल्याने अजित पवार पुढे निघून गेले. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ज्यादिवशी अजितदादांचा भीषण अपघात झाला, त्यादिवशी महादेव जानकर हे देखील त्यांच्यासोबत विमानातून जाणार होते.
advertisement
नेमकं काय म्हणाले महादेव जानकर?
महादेव जानकर यांनी म्हटले की, त्यादिवशी अजित पवार यांनी मला बारामतीमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते. मी आणि अजित पवार एकाच विमानातून जाणार होतो, पण मला पोहोचायला उशीर झाला. अजित पवार यांचे विमान ठरलेल्या वेळेत निघून गेले. मला पोहोचण्यासाठी उशीरा झाला आणि मी बारामतीला जाणे रद्द केले. मला विमानतळावर जाण्यास उशीर झाल्याने माझा जीव वाचला असला तरीही राज्याने एक मोठा नेता नक्कीच गमावले आहे.
advertisement
विमानात कोण कोण होते?
अजित पवार यांचा अपघात झाल्यापासून या विमानात किती लोक होते याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानात 5 लोकं होते. यात दोन पायलट, अजित पवार, एक एअर होस्टेस आणि अजित पवार यांचे अंगरक्षक होते अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे. मात्र काही नेत्यांनी या विमानात 6 लोक असल्याचा दावा केला जात आहे. आता प्रत्यक्षदर्शी आणि गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 6:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांसमोबत 'हा' नेताही विमानाने जाणार होता बारामतीला, पण शेवटच्या क्षणी…









