ग्राहकांना मोठा धक्का! TVS Jupiter 110च्या किंमती वाढल्या, आता द्यावे लागतील एवढे पैसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
TVS Jupiter Price Hike: टीव्हीएसने ज्युपिटरच्या सर्व मॉडल्सवर एक समान वाढ केली नाही. याच्या ड्रम व्हेरिएंटच्या किंमतीत 2,950 रुपये आणि ड्रम अलॉयमध्ये 2,385 रुपयांची वाढ झाली आहे.
advertisement
advertisement
कोणतं व्हेरिएंट सर्वात जास्त महाग होणार? : टीव्हीएसने ज्युपिटरच्या सर्व मॉडल्सवर एक समान वाढ केलेली नाही. याच्या ड्रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत 2,950 रुपये आणि ड्रम अलॉयमध्ये 2,385 ची वाढ झाली आहे. यासोबतच ड्रम SXC मॉडल ₹2,750 आणि डिस्क SXC व्हेरिएंट 3,000 रुपयांनी महाग झाला आहे. सर्वात जास्त वाढ याच्या स्पेशल एडिशन (टॉप व्हेरिएंट) वर गेली आहे. ज्यासाठी आता तुम्हाला 3,250 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.
advertisement
आता काय आहेत नव्या किंमती? : किंमती वाढवल्यानंतर आता टीव्हीएस ज्युपिटर 110 ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 75,600 हजार रुपये झाली आहे. याच्या ड्रम अलॉय व्हेंरिएंटची किंमत आता 79,835 रुपये, ड्रम SXC ची किंमत 84,000 रुपये आणि डिस्क SXC ची किंमत 87,750 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर प्रीमियम फीचर्सचा स्पेशल एडिशन आता ग्राहकांना 88,900 रुपयांच्या किंमतीत मिळेल.
advertisement
दुसऱ्या टीव्हीएस वाहनांच्या किंमतीही वाढल्या : फक्त ज्युपिटरच नाही, तर टीव्हीएसने आपल्या पोर्टफोलियोच्या इतर लोकप्रिय वाहनांच्या किमंतींमध्येही किरकोळ बदल केले आहेत. कंपनीने आपल्या स्पोर्टियर स्कूटर Ntorq 125 च्या किंमतींमध्ये 350 रुपयांची वाढ केली आहे. या व्यतिरिक्त कम्प्यूटर सेगमेंटची बाइक्स Star City Plus आणि Radeon च्या किंमतीही 300 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. खर्च वाढवल्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.
advertisement
बाजारात कोणासोबत आहे टक्कर : ज्युपिटर 110 चा थेट सामना Honda Activa सोबत राहतो. 3,000 रुपयांनी वाढ झाल्यामुळे ग्राहक आता दुसऱ्या पर्यायांचा विचार करत असतील. खरंतर खरंतर, टिकाऊपणा, उत्कृष्ट मायलेज आणि आरामदायी आसनांमुळे ज्युपिटरला अजूनही मागणी आहे. या किमतीत वाढ झाल्याने त्याच्या विक्रीवर काय परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे.





