TRENDING:

ICICI Bank Rule Change: ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून ATM, डेबिट कार्ड, IMPS महागणार

Last Updated:

ICICI बँकेने 1 जुलै 2025 पासून नवीन सर्व्हिस चार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ATM ट्रान्झाक्शन, कॅश डिपॉझिट-विदड्रॉल, IMPS आणि डेबिट कार्ड सेवांसाठी शुल्क आकारले जाणार आहे.

advertisement
तुमचं ICICI बँकेत खातं असेल किंवा तुम्ही ग्राहक असाल, तुमचं खातं नेसल पण क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे बँकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. 1 जुलै 2025 पासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.
News18
News18
advertisement

बँकेनं नवीन सर्व्हिस चार्जची यादी जाहीर केली आहे. यात एटीएम ट्रान्झाक्शन, कॅश डिपॉझिट-विदड्रॉल, IMPS आणि डेबिट कार्ड सेवा यांचा समावेश आहे. काही सेवा मोफत राहणार असल्या तरी, त्या निश्चित मर्यादेनंतर मात्र दररोजच्या व्यवहारांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ICICI ATM वर दरमहा 5 ट्रान्झाक्शन मोफत असतील त्यानंतर प्रत्येक व्यवहाराला 23 रुपये शुल्क द्यावे लागेल.

advertisement

आता लवकर कंफर्म होतील ट्रेनचे वेटिंग तिकीट! रेल्वे नियमात बदल, बुकिंगपूर्वी घ्या जाणून

अन्य बँकेच्या ATM वर, मेट्रो शहरांमध्ये 3 आणि इतर ठिकाणी 5 व्यवहार मोफत. त्यानंतर वित्तीय व्यवहाराला 23 आणि गैर-वित्तीय व्यवहाराला 8.50 शुल्क आकारलं जाईल.आंतरराष्ट्रीय ATM व्यवहारासाठी, कॅश विड्रॉलवर ₹125, तर करन्सी कन्वर्जनवर 3.5% शुल्क लागू होईल. गैर-वित्तीय व्यवहाराला 25 रुपये शुल्क आहे. सीनियर सिटीझन्ससाठी अनेक शुल्कांमध्ये सूट असेल. IMPS व्यवहारही आता मोफत राहणार नाहीत. 1000 रुपयांपर्यंत पैसे पाठवायचे असल्यास 2.50 रुपये शुल्क मोजावे लागेल. तर 1 हजार रुपयांपासून 1 लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 5 रुपये प्रत्येक ट्रान्झाक्शनला घेतले जातील. 1 लाख ते 5 लाख रुपयांसाठी 15 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे.

advertisement

दर महिन्याचे पहिल्या 3 कॅश डिपॉझिट मोफत असतील त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये शुल्क आकारलं जाईल. महिन्याला 1 लाखा रुपयांहून अधिक डिपॉझिट केल्यास 150 रुपये किंवा प्रति 1,000 मागे 3.50 रुपये शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे. थर्ड पार्टी डिपॉझिट्सची मर्यादा 25 हजार इतकी असणार आहे. कॅश व्हिड्रॉवलसाठी देखील हेच नियम लागू करण्यात आले आहेत. पैसे भरणे आणि काढणे आता नियमातच करावे लागले नाहीतर सर्व्हिस चार्ज आकारला जाईल. पहिल्या 3 व्यवहार मोफत, नंतर 150 शुल्क. 1 लाखाहून अधिक रक्कम काढल्यास व्हॅल्यू-बेस्ड चार्ज आकारले जाणार आहेत.

advertisement

Ration Card E-KYC: रेशन कार्डधारकांनो, 7 दिवसांत हे काम कराच! नाहीतर मिळणार नाही धान्य

डेबिट कार्ड शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. सामान्य ग्राहकांसाठी वार्षिक शुल्क 300 रुपये तर ग्रामीण भागातील लोकांसाठी 150 रुपये घेण्यात येणार आहेत. डेबिट कार्ड रिप्लेसमेंटसाठी 300 रुपये शुल्क आकारलं जाईल.आता प्रत्येक व्यवहाराआधी चार्जेस आकारले जाणार आहेत त्यामुळे कोणताही व्यवहार करण्याआधी हे शुल्क तपासून पाहा.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
ICICI Bank Rule Change: ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून ATM, डेबिट कार्ड, IMPS महागणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल