TRENDING:

खासगी नोकरी करताय, तर बँक अकाऊंटमध्ये ठेवा इतके पैसे, नाहीतर येईल मोठं संकट!

Last Updated:

चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला मिळणारा पगार किंवा मिळकत ही काळजीपूर्वक खर्च केली पाहिजे.

advertisement
मुंबई, 12 ऑक्टोबर : चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला मिळणारा पगार किंवा मिळकत ही काळजीपूर्वक खर्च केली पाहिजे. पण, काही लोक पगार मिळताच उधळपट्टी करतात आणि मग महिन्याच्या शेवटी त्यांचं बँक अकाउंट पूर्ण रिकामं होतं. त्यानंतर, खर्च भागवण्यासाठी एखाद्याकडून पैसे उसने घ्यावे लागतात किंवा मग क्रेडिट कार्डचा आधार घ्यावा लागतो. असं का होतं, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? बहुतेक लोक याबद्दल गंभीर नाहीत. कारण, त्यांना वाटतं की आपल्याला दरमहा पगार मिळतो, मग काळजी करण्याची गरजच काय आहे? पण, संकटाच्या काळात ही वृत्ती फार त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक महिन्यात बचत करणं गरजेचं आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

जर तुम्हाला दर महिन्याला नियोजित वेळेवर पगार मिळत असूनही तुम्ही काहीही बचत करू शकत नसाल तर तुम्ही सावध झालं पाहिजे. कारण, बचत होत नसेल तर मग आर्थिक संकटात तुम्ही कसा मार्ग काढणार? उदाहरणार्थ, जर काही कारणास्तव तुमची नोकरी गेली, आणि नवीन नोकरी शोधण्यात काही महिने घालवले, तर तुमचा घरखर्च आणि इतर आर्थिक गरजा कशा पूर्ण होतील, याचा तुम्ही विचार केलाय का? आर्थिक बचत कशी करावी, याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. 'आज तक'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

advertisement

आपत्कालीन निधी का गरजेचा आहे?

अचानक आलेल्या आर्थिक संकटावेळी तुम्हाला आपत्कालीन निधी (Emergency Fund) उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपत्कालीन निधीची तरतूद केली पाहिजे. विशेषत: तुम्ही खासगी नोकरी करत असाल तर तुमचा आपत्कालीन निधी प्राधान्यानं तयार केला पाहिजे. कारण आपत्कालीन परिस्थितीत हा तुमचा सर्वात मोठा आधार होईल. जेव्हा तुम्हाला तुमचा मासिक पगार मिळणार नाही तेव्हा तुम्ही आपत्कालीन निधीचा वापर करू शकाल. काही कारणास्तव आर्थिक मिळकत बंद झाली आणि अशा परिस्थितीत आपत्कालीन निधीही नसल्यास अडचणी आणखी वाढतील. कारण मासिक खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडचे पैसे शिल्लकच नसतील. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहत असाल आणि खासगी नोकरी करत असाल तर सर्वप्रथम एका वेगळ्या खात्यात तुमचा आपत्कालीन निधी ठेवा.

advertisement

आता असा प्रश्न पडतो की आपत्कालीन निधी किती असावा आणि आपत्कालीन निधी कसा तयार करायचा? कारण एखाद्याचं उत्पन्न महिन्याला 20 हजार रुपये आहे तर एखाद्याचं महिन्याला 1 लाख रुपये आहे. मग आपत्कालीन स्थितीसाठी फंड कसा तयार करायचा? आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तुम्ही नोकरी सुरू करताच पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करणं. तो फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरला गेला पाहिजे. नियमांनुसार, आपत्कालीन निधी म्हणून किमान 100 दिवसांच्या खर्चाइतके पैसे शिल्लक असले पाहिजेत. मात्र, कुटुंब मोठं असेल आणि नोकरीत स्थिरता कमी असेल, तर सहा महिन्यांचा खर्च भागेल इतके पैसे आपत्कालीन निधीत जमा असले पाहिजेत.

advertisement

आपत्कालीन निधी प्रत्येकासाठी आवश्यक आहे

उदाहरणार्थ, जर एखाद्याचा पगार दरमहा 50 हजार रुपये असेल तर त्यानं किमान 1.5 लाख रुपये आपत्कालीन निधी म्हणून जमा केले पाहिजेत. जेणेकरून अडचणीच्या वेळी ते उपयोगी पडतील. जर मासिक वेतन 1 लाख रुपये असेल तर 3 ते 5 लाख रुपये आपत्कालीन निधी म्हणून स्वतंत्र बँक खात्यात ठेवावेत. हे पैसे बचत खात्यात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गरज भासल्यास ते लगेच काढता येतील. सोप्या शब्दांत सांगयचं झाल्यास, तुमचा इमर्जन्सी फंड तुमच्या पगाराच्या तिप्पट असावा. हे पैसे नेहमी वेगळ्या बँक खात्यात ठेवा. या निधीतून दरमहा पैसे काढू नका. ही रक्कम फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरा. तुमची नोकरी गेली, अचानक आजारी पडल्यास किंवा या शिवाय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही हा निधी वापरू शकता.

advertisement

या सूत्रासह तयार करा आपत्कालीन निधी

आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी सर्व प्रथम, आपल्या एकूण उत्पन्नातून 30 टक्के बचत करा. त्यापैकी 15 टक्के गुंतवणूक करा, उर्वरित 15 टक्के आपत्कालीन निधी खात्यात हस्तांतरित करा. जोपर्यंत तुमच्या पगाराच्या तिप्पट रक्कम इमर्जन्सी फंड खात्यात जमा होत नाही तोपर्यंत हा ट्रेंड चालू ठेवावा. या शिवाय आपत्कालीन निधीसाठी स्वतंत्र बँक खातं ठेवावं. जेणेकरून त्यात वारंवार व्यवहार होणार नाहीत. इमर्जन्सी फंड तयार झाल्यावर छोट्या गरजांसाठी त्यातून पैसे काढू नका. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या निधीचा डोळे झाकून वापर करा आणि परिस्थिती सामान्य होताच पुन्हा आपत्कालीन निधी तयार करा. जेणेकरून भविष्यात त्याचा वापर करता येईल. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आपत्कालीन निधी केवळ कुटुंबातील सदस्यांसाठीच आवश्यक नाही. तुम्ही एकटे असाल तरीही आपत्कालीन निधी तुमच्या प्राधान्य यादीत सर्वात वर असला पाहिजे.

मराठी बातम्या/मनी/
खासगी नोकरी करताय, तर बँक अकाऊंटमध्ये ठेवा इतके पैसे, नाहीतर येईल मोठं संकट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल