TRENDING:

ITR भरल्यानंतर किती वेळा रिफंड मिळतो, नाही आला तर कुठे करायची तक्रार?

Last Updated:

आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम मुदत 31 जुलै आहे. आयटीआर 2 आणि 3 फॉर्म अॅक्टिव्ह आहेत. रिफंड 24 ते 48 तासांत मिळतोय. अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे.

advertisement
मुंबई: आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपर्यंत ऑनलाईन आयटीआर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. income Tax वेबसाइटवर ITR 2, ITR 3 फॉर्म अॅक्टिव्ह करण्यात आला आहे. आयकर विभाग वेगात काम करत आहे. यावर्षी भरलेले रिटर्न लगेच प्रोसेस होत असून अनेक नागरिकांच्या खात्यात अवघ्या 24 ते 48 तासांत किंवा 5 ते 10 दिवसांत रिफंड जमा होतोय. त्यामुळे ज्यांनी अजून रिटर्न भरलेले नाहीत, त्यांनी आता वेळ न घालवता प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे.
News18
News18
advertisement

तुम्ही कोणता फॉर्म भरणार?

सध्या सॅलरिड वर्गापासून ते छोट्या व्यावसायिकांपर्यंत अनेकजण आपले ITR भरत आहेत. इनकम टॅक्स पोर्टलवर ITR-2 आणि ITR-3 फॉर्म अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे आता अगदी सहजपणे रिटर्न भरता येतं. याआधी रिफंड मिळण्यासाठी महिनाभर वाट बघावी लागायची. पण आता आयकर विभाग रिटर्न आल्यानंतर 1 आठवड्याच्या आतच रक्कम खात्यात पाठवत आहे.

advertisement

ITR भरण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ

यंदा आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ करुन देण्यात आली आहे. आयटीआर भरण्यासाठी अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्ही वेळेत आयटीआर भरला तर रिफंड मिळेल आणि वेटिंगलाही सामोरं जावं लागणार नाही. ही अंतिम तारीख चुकली तर मात्र दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला घरबसल्या आयटीआर भरायचा असेल तर इनकम टॅक्स विभागाच्या साइटला भेट द्या. तिथे PAN नंबर टाकून लॉगइन करा. इ फायलिंग पर्याय निवडा आणि आयटीआर भरुन घ्या.

advertisement

पतीने दिलेल्या पैशांवरही पत्नीला द्यावा लागणार का TAX?

कोणती कागदपत्र जमा करावी लागतात?

आयटीआरसोबत तुम्हाला पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, फॉर्म 16 नोकरदार वर्गासाठी, डोनेशन रिसीप्ट, तुम्ही रेंटने राहात असाल तर त्याची रिसीट, ओनरचा कन्सेंट फॉर्म, शेअर ट्रेडिंग स्टेटमेंट, पॅन लिंक असलेलं बँक अकाऊंट या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्या तुम्हाला अपलोड कराव्या लागणार आहेत. नव्या रिजीमनुसार 12 लाख रुपयांपर्यंत आयकर भरावा लागणार नाही. मात्र जुन्या आयकरनुसार तुम्ही भरत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. जर रिटर्न भरायचं राहिलं असेल, तर आता वेळ वाया घालवू नका. कारण यावेळी रिफंड मिळवायचा असेल, तर वेळेवर अर्ज करणे हीच सर्वात मोठी बचत ठरणार आहे.

advertisement

ITR कुणासाठी अनिवार्य?

परदेश प्रवासावर 2 लाखांहून अधिक खर्च करणारे

वर्षभरात 1 लाखांहून अधिक वीजबिल

चालू खात्यांमध्ये 1 कोटीहून अधिक जमा

व्यवसायिकांची टोटल विक्री 60 लाखांहून अधिक

TDS किंवा TCS 25,000 रुपये पेक्षा जास्त असेल

Income Tax : 'या' 10 उत्पन्नावर भारतात लागत नाही TAX; हे माहित करुन घेणं तुमच्या कर नियोजनात ठरेल उपयोगी

advertisement

Income Tax Refund जमा झाला नसेल तर कुठे करायची तक्रार?

https://www.incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्या

तुमचा PAN नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा

मेनूतील ‘e-Nivaran’ किंवा ‘Grievances’ विभागात जा

‘Submit Grievance’ वर क्लिक करा

‘Refund’ प्रकार निवडा आणि तुमची तक्रार सविस्तर नमूद करा

सबमिट केल्यानंतर, एक Grievance Number मिळेल, ज्याच्या आधारे पुढे स्टेटस ट्रॅक करता येईल

मराठी बातम्या/मनी/
ITR भरल्यानंतर किती वेळा रिफंड मिळतो, नाही आला तर कुठे करायची तक्रार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल