TRENDING:

रेकॉर्ड तेजी नंतर शेअर बाजार धोक्याच्या वळणावर,'ब्लॅक वेन्सडे'ची भीती; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडणार? 13 Share वर टांगती तलवार

Last Updated:

Share Market Prediction: भारत–अमेरिका ट्रेड डीलच्या बातमीमुळे मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी उसळी घेतली, मात्र बाजार बंद झाल्यानंतर आलेल्या तिमाही निकालांनी अनिश्चितता वाढवली आहे. बुधवारी ही तेजी पुढे कायम राहते की प्रॉफिट बुकिंगमुळे बाजार घसरतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

advertisement
मुंबई : मंगळवारी भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डील झाल्याच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि त्याचा थेट फायदा बाजाराला झाला. आता बुधवारी बाजार ही तेजी पुढे कायम ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी महत्त्वाच्या घोषणा आणि तिमाही निकाल जाहीर केले असून, पिडीलाइट, बजाज फायनान्स, NBCC, जेके लक्ष्मी सिमेंट, मॅनकाइंड फार्मा, कंसाई नेरोलॅक, नजारा टेक्नॉलॉजीज, गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट, IRFC, आदित्य बिर्ला कॅपिटल, फर्स्टसोर्स, कॅस्ट्रॉल इंडिया आणि V2 रिटेल या शेअर्सवर बुधवारी विशेष लक्ष राहणार आहे.
News18
News18
advertisement

Pidilite Industries Q3 निकाल

पिडीलाइट इंडस्ट्रीजचा तिसऱ्या तिमाहीतील (Q3) निव्वळ नफा 11.9% वाढून 623.84 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा 557 कोटी रुपये होता. हा आकडा CNBC-TV18 च्या 608 कोटींच्या अंदाजापेक्षा चांगला ठरला आहे. कंपनीचा रेव्हेन्यू 10.1% वाढून 3,709.9 कोटी रुपये झाला, तर EBITDA 12% वाढून 894.4 कोटी रुपये नोंदवला गेला. मार्जिन 24.1% राहिले असून, मागील वर्षी ते 23.7% होते.

advertisement

Bajaj Finance Q3 निकाल

बजाज फायनान्सचा तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा 5.6% घटून 4,066 कोटी रुपये झाला आहे. हा आकडा CNBC-TV18 च्या 5,201 कोटींच्या अंदाजापेक्षा कमी ठरला. मात्र कंपनीचा नेट इंटरेस्ट इनकम (NII) 20.6% वाढून 11,318 कोटी रुपये झाला असून, तो अंदाजाच्या जवळपास आहे.

NBCC (India)

NBCC ने माहिती दिली आहे की, कंपनीला एकूण 277 कोटी रुपयांचे नवे ऑर्डर्स मिळाले आहेत. यामुळे येत्या काळात कंपनीच्या ऑर्डर बुकला चांगला आधार मिळणार आहे.

advertisement

Mankind Pharma Q3 निकाल

मॅनकाइंड फार्माचा निव्वळ नफा 7.5% वाढून 408.7 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा रेव्हेन्यू 11.5% वाढून 3,567 कोटी रुपये, तर EBITDA 12.7% वाढून 919.6 कोटी रुपये नोंदवला गेला. मार्जिन 25.8% राहिले असून, मागील वर्षी ते 25.5% होते.

Kansai Nerolac Q3 निकाल

पेंट क्षेत्रातील कंसाई नेरोलॅकचा तिसऱ्या तिमाहीतील नफा तब्बल 82.2% घसरून 121 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 680 कोटी रुपये होता. कंपनीची आय 3.1% वाढून 1,928 कोटी रुपये झाली. मात्र EBITDA 235 कोटींवरून 230 कोटींवर घसरला, म्हणजेच 2.3% घट झाली. मार्जिन 11.6% राहिले, जे मागील वर्षी 12.2% होते. नफ्यातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे इतर उत्पन्नात घट, खर्चात 3.5% वाढ आणि लेबर कोडमुळे 44.7 कोटींचा अतिरिक्त भार. तसेच मागील वर्षी कंपनीला 629 कोटींचा एक्सेप्शनल गेन मिळाल्यामुळे त्या वेळी नफा प्रचंड वाढला होता.

advertisement

JK Lakshmi Cement Q3 निकाल

जेके लक्ष्मी सिमेंटचा निव्वळ नफा 23% घटून 57 कोटी रुपये झाला आहे. रेव्हेन्यू 6.3% वाढून 1,588 कोटी रुपये झाला, तर EBITDA 2.1% वाढून 205.5 कोटी रुपये राहिला. मार्जिन 12.9% होते, जे मागील वर्षी 13.4% होते.

Nazara Technologies Q3 निकाल

नजारा टेक्नॉलॉजीजचा नफा 35.8% घसरून 8.8 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी हा नफा 13.7 कोटी रुपये होता. कंपनीची आय 24% घटून 406 कोटी रुपये झाली. मात्र EBITDA 80.7% वाढून 67.4 कोटी रुपये झाला आहे. मार्जिन 16.6% वर पोहोचले असून, मागील वर्षी ते फक्त 7% होते. खर्चात मोठी घट झाल्यामुळे नफ्यातील घसरण मर्यादित राहिली.

advertisement

Godrej Agrovet Q3 निकाल

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर जवळपास स्थिर राहून 109.9 कोटी रुपये झाला आहे. रेव्हेन्यू 11% वाढून 2,718 कोटी रुपये आणि EBITDA 10% वाढून 241.9 कोटी रुपये नोंदवला गेला. मार्जिन 8.9% वर स्थिर राहिले.

IRFC

IRFC ने VOCPA आणि Sagarmala Finance Corporation यांच्यासोबत Outer Harbour Development प्रकल्पासाठी MoU वर स्वाक्षरी केली आहे. या कराराचा उद्देश आउटर हार्बरच्या विकासासाठी वित्तीय सहकार्य आणि गुंतवणूक संधी मजबूत करणे हा आहे.

Aditya Birla Capital Q3 निकाल

आदित्य बिर्ला कॅपिटलचा निव्वळ नफा 41% वाढून 983 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा रेव्हेन्यू 30% वाढून 14,181 कोटी रुपये झाला असून, Total Lending Portfolio 30% वाढून 1.90 लाख कोटी रुपये झाला आहे.

Firstsource Solutions Q3 निकाल

फर्स्टसोर्सचा नफा 33% घटून 120 कोटी रुपये झाला आहे. रेव्हेन्यू 6.6% वाढून 2,467 कोटी रुपये आणि EBIT 17.3% वाढून 315.6 कोटी रुपये झाला आहे. मार्जिन 12.8% राहिले, जे मागील तिमाहीत 11.6% होते.

Castrol India Q3 निकाल

कॅस्ट्रॉल इंडियाचा नफा 9.9% घटून 244 कोटी रुपये झाला आहे. रेव्हेन्यू 6.4% वाढून 1,440 कोटी रुपये, तर EBITDA 2.1% घटून 368.5 कोटी रुपये झाला आहे. मार्जिन 25.6% राहिले, जे मागील वर्षी 27.8% होते.

V2 Retail Q3 निकाल

V2 रिटेलने दमदार कामगिरी केली असून, निव्वळ नफा तब्बल 99.3% वाढून 102.06 कोटी रुपये झाला आहे. रेव्हेन्यू 57.2% वाढून 929.2 कोटी रुपये आणि EBITDA 55.8% वाढून 173.68 कोटी रुपये नोंदवला गेला. मार्जिन 18.69% राहिले.

एकंदरीत पाहता, भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे बाजारात आलेली तेजी आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यामुळे बुधवारी बाजारात चांगली हालचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
रेकॉर्ड तेजी नंतर शेअर बाजार धोक्याच्या वळणावर,'ब्लॅक वेन्सडे'ची भीती; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडणार? 13 Share वर टांगती तलवार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल