मागील आठवड्यात बाजारात मोठी घसरण झाली होती. BSE Sensex तब्बल 2,368.29 अंकांनी म्हणजेच 2.91 टक्क्यांनी घसरला. तर Nifty 50 निर्देशांक 728.2 अंकांनी म्हणजेच 2.89 टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचे लक्ष अनेक महत्त्वाच्या घटकांकडे लागले आहे.
पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम
विश्लेषकांच्या मते West Asia मध्ये सुरू असलेला संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ही बाजाराची दिशा ठरवणारी प्रमुख कारणे ठरतील. तसेच जागतिक बाजारांचा कल आणि परदेशी गुंतवणूकदारांची (FII) ट्रेडिंग गतिविधी देखील गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित करू शकते.
advertisement
Religare Broking Ltd चे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा यांनी सांगितले की या आठवड्यात जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि पश्चिम आशियातील भूराजकीय घडामोडी बाजारासाठी महत्त्वाचे बाह्य घटक ठरतील. याशिवाय या आठवड्यात काही महत्त्वाचे मॅक्रो-इकॉनॉमिक आकडे जाहीर होणार असून त्याचाही अल्पकालीन बाजार भावनांवर परिणाम होऊ शकतो.
देशांतर्गत स्तरावर गुंतवणूकदारांचे लक्ष 12 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) महागाईच्या आकडेवारीकडे लागलेले असेल. दरम्यान जागतिक तेल बेंचमार्क Brent Crude च्या किमती 8.52 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 92.69 डॉलरवर पोहोचल्या आहेत.
संपूर्ण आठवडा अस्थिर राहण्याची शक्यता
Enrich Money चे सीईओ पोनमुडी आर यांनी सांगितले की पश्चिम आशियातील सुरू असलेल्या भूराजकीय तणावामुळे संपूर्ण आठवडा बाजार अस्थिर राहू शकतो. गुंतवणूकदार विशेषतः कच्च्या तेलाच्या किमतींच्या हालचालीकडे आणि जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवून असतील.
त्यांच्या मते परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे (FII) गुंतवणूक प्रवाह आणि चलनातील चढ-उतारही महत्त्वाचे संकेत देतील. कारण यावरून भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमध्ये जागतिक भांडवलाचे वाटप आणि गुंतवणूकदारांचा विश्वास किती आहे हे स्पष्ट होते.
विदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढली
अजीत मिश्रा यांनी सांगितले की पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या भावना दबावाखाली आल्या आहेत. त्यामुळे बाजारात तीव्र घसरण झाली. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील चार ट्रेडिंग सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधून सुमारे 21,000 कोटी रुपये म्हणजेच अंदाजे 2.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून घेतली आहे.
मिडल ईस्ट संघर्षाचा दबाव
Geojit Investments Limited चे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की Middle East मधील संघर्षाबाबत असलेली अनिश्चितता, बाजारातील सततची घसरण, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयातील घसरण यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. त्यांच्या मते जोपर्यंत या संघर्षाचा स्पष्ट परिणाम समोर येत नाही आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी होत नाहीत, तोपर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार पुन्हा बाजारात खरेदीदार म्हणून परत येण्याची शक्यता कमी आहे.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की 90 डॉलरपेक्षा जास्त दराने ट्रेड होणारे Brent Crude भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारासाठी चांगली बातमी नाही.
