अडव्हान्स बुकिंगचा फायदा
विशेषज्ञ मानतात की, फ्लाइट तिकीट स्वस्तात मिळवण्यासाठी अडव्हान्स बुसिंग सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या 1 ते 2 महिन्यापूर्वी तिकीट बुक केले तर तुम्हाला चांगली डील मिळू शकते. अगदी वेळेवर तिकीट घेतल्याने भाडं वाढू शकतं. या व्यतिरिक्त वीकडेज, विशेषतः मंगळवार आणि बुधवारी तिकीटाच्या किंमती कमी असतात. ज्यामुळे अतिरिक्त बचत केली जाऊ शकते.
advertisement
बदला फोनची फक्त एक सेटिंग! कधीच हॅक होणार नाही अकाउंट, पैसे राहतील सेफ
विमान तिकीटाच्या किंमती कधी कमी होतात?
सध्याच्या काळात देशांतर्गत एयरलाइन्समध्ये प्रतिस्पर्धा वाढली आहे. ज्यामुळे कंपन्या भाडे कमी ठेवून प्रवाशांना आकर्षित करत आहेत. यासोबतच प्रवाशांच्या संख्येतही चढ-उतार आणि चांगली फ्लीट मॅनेजमेंटही भाडं नियंत्रित ठेवण्यात मदत करतेय. काही रुट्सवर ऑफ-पीक सीझनमध्येही भाडे कमी पाहायला मिळतात. ज्यामुळे प्रवाशांना जास्त ऑप्शन मिळत आहेत.
पेट्रोल पंपावर फक्त झिरो बघून काही होणार नाही, बघा 'ही' गोष्ट; अन्यथा फसलाच म्हणून समजा
स्मार्ट ट्रिक्सने करा बचत
स्वस्त तिकिटे बुक करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. Skyscanner सारख्या फ्लाइट सर्च प्लॅटफॉर्मवर प्राइस अलर्ट सेट केल्याने तुम्हाला भाड्यातील बदलांविषयी माहिती मिळत राहते. वेगवेगळ्या वेबसाइट्सवरील किमतींची तुलना करणे, तुमच्या ब्राउझरचा इनकॉग्निटो मोड वापरणे आणि ऑफर कोडचा फायदा घेणे यांमुळे देखील खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.
सुट्टयांमध्ये समजदारीने करा प्रवास
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढत्या मागणीमध्ये तुम्ही योग्य प्लॅनिंग केली तर हवाई प्रवास करणे शक्य आहे. प्रवासाला लवचिक तारीख निवडावी आणि सकाळी किंवा रात्री उशीराच्या फ्लाइटला प्राधान्य द्यावे. थोडी समजदारी आणि योग्य वेळी बुकिंग केल्याने पैशांची बचत केली जाऊ शकते. यासोबतच प्रवासाचा अनुभवही चांगला होऊ शकतो.
