तज्ज्ञांच्या मते या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढू शकतात आणि त्या 150 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतात. हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एखाद्या ‘ऑइल बॉम्ब’पेक्षा कमी ठरणार नाही.
जगाच्या तेलपुरवठ्याची कणा ठप्प
इराणचा हा निर्णय थेट अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांसाठी मोठे आर्थिक आव्हान आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यताही वाढल्याचे मानले जात आहे.
advertisement
Strait of Hormuz इतका अरुंद आहे की त्याच्या सर्वात कमी रुंदीच्या भागात जहाजांना जाण्यासाठी केवळ 3 किलोमीटरचा मार्ग उपलब्ध असतो. इराणने याच ‘कमकुवत’चा धोरणात्मक वापर केला आहे. या अरुंद समुद्री मार्गातून जगातील सुमारे 25 टक्के तेल आणि वायू वाहतूक होते. हा मार्ग बंद होण्याचा थेट अर्थ म्हणजे जागतिक स्तरावर भीषण ऊर्जा संकट.
होर्मुज बंद झाल्यास काय परिणाम?
तेलाची तीव्र टंचाई: भारत, चीन आणि जपानसारखे आशियाई देश आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर या मार्गावर अवलंबून आहेत. पुरवठा थांबल्यास पेट्रोल-डिझेलची कमतरता निर्माण होऊ शकते.
महागाईचा स्फोट: तेलाचे दर वाढल्यास मालवाहतूक, वीज निर्मिती आणि इतर सर्व क्षेत्रांतील खर्च वाढतील. परिणामी जगभरात महागाई विक्रमी पातळीवर जाऊ शकते.
लष्करी संघर्षाचा धोका: अमेरिका नेहमीच होर्मुज खुला ठेवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची भूमिका घेत आली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन नौदल आणि इराण यांच्यात समुद्रात थेट संघर्ष होण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे.
