जय रेवाळे यांनी घाटकोपर खाऊ गल्लीत छोटासा फूड स्टॉल सुरू केला. पहिल्याच दिवशी खवय्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी व्यवसाय विस्तारण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांतच नवी मुंबईत क्रेझी बाऊल्स नावाचं पहिलं अधिकृत शॉप सुरू झालं. येथील यश पाहून त्यांनी पुढे दादरमध्ये दुसरी शाखा उघडली. आज दादरमधील त्यांच्या शॉपमध्ये दररोज 150 ते 200 बाऊल्स विकले जातात, आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
advertisement
मराठवाड्यातील शेतकऱ्याची कमाल, एका एकरात केला नवीन प्रयोग, दरवर्षी 11 लाख नफा
क्रेझी बाऊल्समध्ये मिळणारे चॉकलेट डेझर्ट्स हे फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या दर्जाच्या बरोबरीचे असून, ते अगदी परवडणाऱ्या दरात दिले जातात. यामुळे अनेक खवय्यांसाठी हा ब्रँड एक आवडता पर्याय ठरला आहे. सध्या त्यांच्या मेनूमध्ये 20 पेक्षा अधिक प्रकारचे डेझर्ट बाऊल्स उपलब्ध आहेत. यामधून त्यांना महिन्याला 60 हजार कमाई होत आहे.
येथील ट्रिपल चॉकलेट बाऊल हे खास आकर्षण असून त्यामध्ये गरमागरम ब्राउनी, मेल्ट मिल्क चॉकलेट, डार्क आणि व्हाइट चॉकलेटसोबत विविध टॉपिंग्जचा समावेश आहे. याशिवाय बिस्कॉफ चॉकलेट, किटकॅट बाऊल, दुबई कुनाफा, रेड वेल्वेट, डार्क हेवेन आणि क्रेझी स्पेशल हे बेस्टसेलिंग पर्याय आहेत. हे सर्व बाऊल्स दोन साइजमध्ये पर्सनल आणि शेअरिंग मिळतात.
पावसाळ्यात गरमागरम चॉकलेटचा आनंद घ्यायचा असेल, तर क्रेझी बाऊल्स नक्कीच भेट देण्यासारखे ठिकाण आहे. हेल्थ कॉन्शस ग्राहकांसाठी येथे झिरो शुगर ब्राउनीज आणि केक्ससुद्धा उपलब्ध आहेत.