कोल्हापूर : एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे पद्धतशीर गुंतवणूकीचा हा सर्वोत्तम निर्णय आहे, असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुम्ही त्याबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. पण एसआयपी सुरू करताना ती एसआयपी कोणत्या तारखेपासून सुरू करावी?, त्याचे विशिष्ठ सूत्र कोणता आहे का? असे अनेक प्रश्न गुंतवणूक दारांच्या मनात असतात. याच सर्व प्रश्नांबाबत जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने गुंतवणूक सल्लागार ऋचिर थत्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या सर्व विषयावर महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
एसआपी सुरू करण्यासाठी योग्य तारीख कोणती?
एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी योग्य तारीख निवडण्यासाठी कोणतेही विशिष्ट सूत्र नसले तरी, एचडीएफसी बँकेच्या मते, गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही यासाठी प्रत्येक महिन्याच्या 23 ते 28 तारखे दरम्यानची तारीख निवडावी, असे रुचिर थत्ते सांगतात. सामान्यतः, गुंतवणूकदार एसआयपीशी लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे उपलब्ध असल्याची माहिती असलेल्या तारखेनुसार एसआयपीची तारीख ठरवतात. एसआयपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटर वापरू शकता, जेणेकरून गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेल्या रिटर्नची कल्पना येईल.
पेमेंट तारीख चुकली तर काय होतं?
एसआयपी ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार ठराविक अंतराने पूर्व-निर्धारित म्युच्युअल फंड योजनेत निश्चित रक्कम गुंतवतात. ही एसआयपी एकतर मासिक किंवा त्रैमासिक आधारावर विशिष्ट गुंतवणूक असते. त्याची तारीख निश्चित असते. त्यासोबतच प्रत्येक एसआयपीमध्ये ऑटो डेबिट ट्रान्जॅक्शन फीचर असते, त्यामुळे पैसे लिंक बँक खात्यातून ठराविक तारखेला आपोआप जमा होतात. पण खात्यात शिल्लक नसल्यामुळे एसआयपीमधील पैसे नियोजित तारखेला जमा केले नाहीत, तर बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात. म्हणून, देय तारखेला तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे, रूचिर थत्ते यांनी सांगितले.
मराठमोळ्या पुरुष-महिला गोविंदांची कमाल, तब्बल 12 देशांमध्ये कमावलं महाराष्ट्राचं नाव!
सातत्य आणि शिस्त -
जेव्हा गुंतवणूकदार एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा नियमितपणे लहान रक्कम बाजूला ठेवली जाते आणि कालांतराने गुंतवणुकीवरील परतावा गुंतवणूक दारांना अधिक परतावा मिळू लागतो. याला चक्रवाढ असे म्हटले जात, ज्यामुळे दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात परतावा मिळू शकतो.
मुळात एसआयपी सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचत असण्याची गरज नाही. गुंतवणूकदार अगदी 100 रुपयांपासून सुरुवात करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता प्रत्येकासाठी एसआयपी फायदेशीर ठरते. तसेच या ठराविक दिवशी आणि ठराविक केलेल्या गुंतवणुकीमुळे एक प्रकारची शिस्त आपल्यात निर्माण होते, असेही त्यांनी सांगितली.
सूचना - ही माहिती आर्थिक सल्लागार यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांशी अवश्य चर्चा करा. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.