नेमकं काय घडलं? ७१ लाख महिला का झाल्या बाद
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचावेत यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केलं होतं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वारंवार सूचना देऊनही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. ज्यांनी प्रक्रिया केली, त्यांच्या अर्जात तांत्रिक चुका निघाल्या. आधार कार्ड लिंक नसणे, बँक खात्याशी मोबाईल नंबर जोडलेला नसणे किंवा माहितीमध्ये तफावत असणे, अशा कारणांमुळे तब्बल ७१ लाख महिलांना या योजनेतून तूर्तास बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
advertisement
शेवटची संधी, यानंतर मुदतवाढ नाही!
या ७१ लाख महिलांना आपले अर्ज सुधारण्यासाठी आणि ई-केवायसीमधील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंतची मुदतवाढ दिली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, "आज रात्रीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही." त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही आपले प्रोफाईल अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी ही 'आर या पार'ची लढाई आहे.
फेब्रुवारीचे १५०० आलेत का? लगेच तपासा!
राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये जमा झाले आहेत. जर तुमच्या ओळखीतल्या कोणाला किंवा तुम्हाला हे पैसे मिळाले नसतील, तर समजावं की तुमच्या अर्जात काहीतरी घोळ आहे. आज दिवसभरात जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन किंवा मोबाईल अॅपवरून आपले ई-केवायसी 'रिचेक' करणं गरजेचं आहे. अन्यथा, यापुढचे सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. सरकारने दिलेली ही शेवटची संधी हुकली, तर ७१ लाखांच्या या महाकाय आकड्यातून तुमचं नाव बाहेर काढणं अशक्य होईल.
बहिणींनो, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
तुमच्या अर्जाचं ऑनलाईन तपासा
बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, याची खात्री करा.
जर ई-केवायसीमध्ये त्रुटी असेल, तर ती आज संध्याकाळपर्यंत दुरुस्त करून घ्या.
