खरं तर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला आहे. या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रूपयेच जमा झाले आहेत.पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रूपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतल्याची माहिती राजकीय सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे महिलांच्या खात्यातही नवीन वर्षात 1500 रूपयेच जमा होण्याची शक्यता आहे.
advertisement
'या' तारखेला खात्यात पैसे येणार?
महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही.पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे.गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रात आणखीण गोड होणार आहे.
'त्या' लाडक्या बहिणींना मोठा झटका, 9000 रूपये सरकारला परत करावे लागणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. त्यामुळे हे निकष काय आहेत? हे जाणून घेऊयात.
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! सरकारने 'त्या' महिलेचे काढून घेतलेच नाही, नेमकं प्रकरण काय?
अर्ज बाद होण्याचे निकष काय?
- कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
- घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
- शासकीय नोकरी अलकाना घेतलेला योजनांचा लाभ
- एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार