Ladki Bahin Yojana : 'त्या' लाडक्या बहिणींना मोठा झटका, 9000 रूपये सरकारला परत करावे लागणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे.
Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत, ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे. त्या या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसला आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ राज्यातील 19 लाख 20 हजार 85 हजार घेत आहेत. या योजनेचा लाभे घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला होता.त्यानुसार त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत होते. पण आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या अर्जाबाबत तक्रारी आल्या आहेत.त्यांच्या अर्जाची छाननी होणार आहे.
advertisement
त्यामुळे जर सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे, असा निकष लावला जर या शेतकरी महिलांना लावला तर 19 लाख 20 हजार 85 हजार शेतकरी बहिणींवर लाभ कपातीची टांगती तलवार येऊ शकते. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहिण योजनेला लाभ घेऊ द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय फडणवीस सरकारला घ्यावा लागणार आहे.
advertisement
शेतकरी सन्मान योजनेत सुमारे 20 लाख, राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतरण योजनेतील 10 लाख 90 हजार 465 जणांना या नियमांचा फटका बसू शकतो. तिन्ही योजनेतील 30 लाख 10 हजार 550 शेतकरी बहिणींवर टांगती तलवार येऊ शकते.
अर्ज बाद होण्याचे निकष काय?
- कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
- घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
- शासकीय नोकरी अलकाना घेतलेला योजनांचा लाभ
- एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार
advertisement
या निकषानुसार ज्या महिला लाभ घेत आहेत, त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin Yojana : 'त्या' लाडक्या बहिणींना मोठा झटका, 9000 रूपये सरकारला परत करावे लागणार?