ऑफिस-कॉलेजला जाण्यासाठी बेस्ट आहेत या 125cc Scooter! किंमत 74,300 रुपयांपासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
देशातील सर्वात स्वस्त 125 सीसी स्कूटरच्या लिस्टमध्ये आम्ही Yamaha Ray ZR 125, Hero Destini 125, TVS Jupiter 125, Suzuki Access 125 आणि Honda Activa 125 चा समावेश केला आहे. याची किंमत आणि खासियतविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Most Affordable 125cc Scooter in India:तुम्हाला रोजच्या प्रवासासाठी स्कूटर घेण्याचा विचार करत असाल आज आपण अशाच काही ऑप्शन्सविषयी जाणून घेणार आहोत. स्कूटर मार्कटमध्ये सर्वात जास्त 125 सीसी सेगमेंट प्रसिद्ध आहे. कारण ती चांगल्या पॉवरसह चांगली रायडिंग क्वालिटी प्रदान करते. तुम्ही येणाऱ्या काळात एक स्वस्त आणि चांगली 125cc स्कूटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती तुम्ही अवश्य वाचा.
advertisement
आज आपण 5 सर्वात स्वस्त 125 सीसी स्कूटरची लिस्ट घेऊन आलो आहोत.Cheapest 125cc Scooter च्या लिस्टमध्ये Cheapest 125cc Scooter वाली लिस्ट में Yamaha Ray ZR 125, TVS Jupiter 125, Suzuki Access 125, Hero Destini 125 आणि Honda Activa 125 नावाचा समावेश आहे. या सर्व 125cc इंजिनच्या स्कूटर्स आहेत. ज्या पॉवर, मायलेज, फीचर्स आणि किंमतीमध्ये चांगला बॅलेन्स देतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
Yamaha Ray ZR 125 : याच्या बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास 74,300 रुपयांपासून सुरु होते आणि टॉप व्हेरिएंट ₹86,900-₹88,425 पर्यंत जाते. हा सर्वात स्वस्त ऑप्शन आहे. विशेषतः बेस मॉडलमध्ये. तरुणांना पसंत येणारा स्पोर्टी लूक, लाइटवेट बॉडी (जवळपास 99 kg) आणि हायब्रिड टेक्नॉलॉजीसह बेस्ट मायलेज (71 kmpl पर्यंत क्लेम्ड) मिळतो. ही आपल्या वेगवान स्पडी आणि चांगल्या हँडलिंगसाठी ओळखली जाते.
advertisement
Hero Destini 125 : बेस व्हेरिएंटची किंमत 75,838 पासून सुरु होते. जी ZX आणि ZX+ मध्ये 83,997 ते 84,919 रुपयांपर्यंत जाते. ही देखील खुप परडणारी आणि फॅमिली वापरासाठी बेस्ट आहे. यामध्ये मोठा अंडरसीट स्टोरेज, एलईटी लाइट्स, चांली सेटिंग आणि 59 kmpl पर्यंतचा मायलेज मिळतो. Hero सर्व्हिस नेटवर्क खुप मजबतू आहे. जी ग्रामीण आणि लहान शहरांसाठी फायदेशीर ठरते.
advertisement
TVS Jupiter 125 : बेस व्हेरिएंट (ड्रम अलॉय) साठी किंमत 75,950 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक स्मार्टएक्सनेक्टसाठी 86,900-93,088 रुपयांपर्यंत असते. या प्रॅक्टिकल स्कूटरमध्ये 5.1-लिटरची मोठी फ्यूल टँक, एक्सटर्नल फ्यूल फीलर, आय-गो स्टार्ट-स्टॉप सिस्टम आणि 57 kmpl पर्यंतचा दावा केलेला मायलेज आहे. रुंद सीट आणि भरपूर स्टोरेज स्पेस (21 लिटर पर्यंत) यामुळे कुटुंबांसाठी हे सर्वात आरामदायी मानले जाते.
advertisement
Suzuki Access 125 : याची किंमत बेस स्टँडर्ड एडिशन 77,684 रुपयांपासून सुरु होऊन स्पेशल एडिशन आणि राइड कनेक्टमध्ये 83,826 रुपयांपासून ते 96,218 रुपयांपर्यंत जाते. ही रिफाइंड इंजिन, स्मूद राइड आणि चांगल्या बिल्ड क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे. मायलेज 45-50 kmpl च्या आसपास राहते. ब्लूटूथ कनेक्टेड व्हेरिएंटमध्ये नेव्हिगेशन आणि कॉल अलर्ट सारखे फीचर्स मिळतात. सर्व्हिस नेटवर्कही चांगलं आहे.
advertisement
Honda Activa 125 : बेस व्हेरिएंटची किंमत ₹89,256 पासून सुरू होते आणि DLX आणि इतरांसाठी ₹92,297 ते ₹94,096 पर्यंत जाते. हे सर्वात महाग आहे, परंतु विश्वासार्हता, रीसेल व्हॅल्यू आणि स्मूद इंजिनसाठी ते नंबर 1 वर आहे. सुमारे 47 kmplचा मायलेज, एलईडी लाईट्स, सायलेंट स्टार्ट आणि कमी कंपन यामुळे ते एक उत्तम पर्याय बनते. होंडा युनिव्हर्सल सर्व्हिस देते आणि ही 125ccची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे.
advertisement
सल्ला : तुमचे बजेट ₹80,000 पेक्षा कमी असेल, तर Yamaha Ray ZR 125 किंवा Hero Destini 125 हे सर्वोत्तम पर्याय आहेत. Yamaha स्पोर्टी आणि इंधन-कार्यक्षम आहे, तर Hero कुटुंब-केंद्रित आणि कमी देखभालीची आहे. तुम्हाला थोडी जास्त जागा आणि फीचर्स हवी असतील तर TVS Jupiter 125 हा एक संतुलित पर्याय आहे. सुझुकी Access रिफाइनमेंटसाठी चांगली आहे, परंतु थोडी महाग आहे. Honda Activa 125 प्रीमियम फील देते, परंतु या लिस्टमध्ये सर्वात महाग आहे.






