advertisement

शोभायात्रेतून चिमुरडा बेपत्ता, दुसऱ्या दिवशी थेट बॉडी मिळाली, नागपुरात खळबळ

Last Updated:

शुक्रवारी सकाळपर्यंत अथर्वचा शोध न लागल्याने गिट्टीखदान परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते.

अथर्व नानोरे
अथर्व नानोरे
नागपूर: हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या आनंदात शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय अथर्व नानोरे या बालकाचा मृतदेह कळमेश्वर परिसरातील भरतवाडा भागात मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी चिटणीस चौकात हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत अथर्व सहभागी झाला होता, मात्र गर्दीत तो अचानक दिसेनासा झाला. अथर्व हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. तो बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.
शुक्रवारी सकाळपर्यंत अथर्वचा शोध न लागल्याने गिट्टीखदान परिसरातील नागरिक आक्रमक झाले. पोलीस तपासात विलंब होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी परिसरात आंदोलन केले. जोपर्यंत मुलगा सापडत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती.
advertisement

कळमेश्वर परिसरात आढळला मृतदेह

एकीकडे शोधकार्य सुरू असतानाच, कळमेश्वर जवळील भरतवाडा परिसरात एका मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ओळख पटवली असता, तो मृतदेह बेपत्ता अथर्वचाच असल्याचे निष्पन्न झाले.
अथर्वचा मृत्यू नक्की कसा झाला? घातपात की अन्य काही कारण? याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शोभायात्रेतून चिमुरडा बेपत्ता, दुसऱ्या दिवशी थेट बॉडी मिळाली, नागपुरात खळबळ
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement