Success Story : डिलिव्हरी बॉय झाला मालक! सायलीची साथ अन् राहुल झाला बॉस, महिन्याला इतकी कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
केवळ मेहनत, जिद्द आणि एकमेकांवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी पुण्यातील नारायण पेठ भागात कॅफे ग्रीलिनो या नावाने स्वतःचा कॅफे सुरू केला असून अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे : कोणाच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारावा, स्वबळावर उभे राहावे असे स्वप्न अनेक तरुण पाहतात. पुण्यातील राहुल पारगोंड आणि सायली चोरगे या दोघांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. केवळ मेहनत, जिद्द आणि एकमेकांवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी पुण्यातील नारायण पेठ भागात कॅफे ग्रीलिनो या नावाने स्वतःचा कॅफे सुरू केला असून अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राहुल पारगोंड हे शिक्षण घेत असताना डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी चाकण एमआयडीसी परिसरात फिल्डमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला. या काळात विविध प्रकारचे लोक, व्यवसायपद्धती आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताना व्यवसाय कसा चालतो, ग्राहकांशी कसे वागायचे, वेळेचे नियोजन कसे करायचे हे प्रत्यक्ष शिकायला मिळाले. त्या अनुभवातूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अधिक बळावली, असे राहुल सांगतात.
advertisement
याच दरम्यान सायली चोरगे यांची राहुल यांच्याशी भेट झाली. सायली या लॅब टेक्निशियन असून त्यांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मी एकटी मुलगी असल्याने व्यवसाय कसा करणार, हा प्रश्न अनेकांना पडायचा. मात्र राहुलची साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आणि आम्ही एकत्र कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे सायली सांगतात. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या. आर्थिक अडथळे, जागेचा प्रश्न आणि कामाचा अनुभव नसणे या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. त्या काळात सायली यांनी ऑलिन्टेरिंगचा जॉबही केला.
advertisement
सुरुवातीला कोथरूड परिसरात हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी कॅफे नारायण पेठेत स्थलांतरित करण्यात आला आणि कॅफे ग्रीलिनो या नावाने नव्याने सुरुवात झाली. पिझ्झा, बर्गर, सँडविच, कॉफी यांसारख्या पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. घरच्यांची साथ आणि ग्राहकांचा वाढता प्रतिसाद यामुळे आज हा व्यवसाय स्थिर होत आहे.
advertisement
या व्यवसायाच्या माध्यमातून सायली यांना दरमहा सुमारे 80 ते 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा व्यवसाय असाच पुढे नेऊन आणखी वाढवायचा आहे, असा विश्वास राहुल आणि सायली दोघांनीही व्यक्त केला. कॅफे ग्रीलिनोचा हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 4:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : डिलिव्हरी बॉय झाला मालक! सायलीची साथ अन् राहुल झाला बॉस, महिन्याला इतकी कमाई






