TRENDING:

RBIने रेपो रेट घटवताच आज या सरकार बँकेने लोन केलं स्वस्त! कपात किती?

Last Updated:

आजपासून ग्राहकांना आरबीआयच्या रेपो रेट कपातीचे फायदे मिळू लागले आहेत. बँक ऑफ बडोदाने आपला कर्जदर 25 बेसिस पॉइंट्स (0.25%) ने कमी केला आहे.

advertisement
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने काल (5 डिसेंबर) रेपो रेट कमी केला आणि आज (6 डिसेंबर) सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने लगेचच आपल्या ग्राहकांना हे फायदे दिले. रेपो रेट 5.25% वर पोहोचताच, बँकेनेही आपला लेंडिंग रेट कमी केला, म्हणजेच ग्राहकांना कमी EMI भरावे लागतील.
लोन
लोन
advertisement

बँकेने सांगितले की, बडोदा रेपो बेस्ड लेंडिंग रेट (BRLLR) 8.15% वरून 7.90% पर्यंत कमी करण्यात आला आहे. हे नवीन रेट 6 डिसेंबर 2025 पासून लागू होतील. आरबीआयने रेपो रेट 5.50% वरून 5.25% पर्यंत कमी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकेचा 2.65% चा मार्कअप तसाच राहील. रेपो रेट कपातीचा सर्वात थेट फायदा होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांना होईल, कारण EMI कमी होऊ शकतो.

advertisement

रेंटच्या घरातही निर्धास्त राहायचंय? मग Rent Agreement अ‍ॅड करा या 10 गोष्टी

FY26 मध्ये जीडीपी विकास दर 7.3% वर राहू शकतो

बँक ऑफ बडोदाचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा आरबीआयने त्यांच्या एमपीसी बैठकीत चालू आर्थिक वर्ष 2025-26 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 7.3% पर्यंत वाढवला होता. पूर्वी, हा अंदाज 6.8% होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2025 तिमाहीत वाढ 7% आणि जानेवारी-मार्च 2026 तिमाहीत 6.5% राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल-जून 2026 तिमाहीत वाढ 6.7% आणि जुलै-सप्टेंबर 2026 तिमाहीत 6.8% राहण्याचा अंदाज आहे. मल्होत्रा ​​म्हणाले की, प्रमुख डेटा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आर्थिक अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये वाढ दर्शवतो. शेतीमधील सुधारित शक्यता, जीएसटी तर्कसंगत करण्यासाठी पावले आणि सुधारित कॉर्पोरेट बॅलन्स शीट यासारखे घटक आर्थिक क्रियाकलापांना सपोर्ट देत राहतील.

advertisement

Personal Loan: पर्सनल लोन बंद केलं तर क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का?

फेब्रुवारी 2025 पासून रेपो रेट 1.25% ने कमी केला

फेब्रुवारी 2025 पासून आरबीआयने चार हप्त्यांमध्ये रेपो रेट एकूण 1.25% ने कमी केला आहे. खरंतर, ऑगस्ट आणि ऑक्टोबरच्या बैठकींमध्ये रेपो रेटमध्य कोणताही बदल झाला नाही. तो 5.5% वर जसाच्या तसा ठेवण्यात आला होता.

advertisement

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने बँका RBIकडून पैसे घेतात. जेव्हा बँकांना रोख रकमेचा तुटवडा जाणवतो तेव्हा त्या सरकारी बॉन्ड तारण ठेवून आरबीआयकडून कर्ज घेतात. या कर्जावर आरबीआयने आकारलेल्या व्याजाला रेपो रेट म्हणतात. आरबीआय रेपो रेट वाढवते, तर बँकांसाठी कर्ज घेणे अधिक महाग होते. आरबीआयने ते कमी केले तर बँकांना स्वस्त कर्ज मिळते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
RBIने रेपो रेट घटवताच आज या सरकार बँकेने लोन केलं स्वस्त! कपात किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल