TRENDING:

'सेबी'चा मोठा निर्णय! शेअर मार्केट ट्रेडिंगचं प्रशिक्षण देताना लाइव्ह ट्रेडिंगचा वापर करण्यास बंदी

Last Updated:

Fake Stock Market Gurus: 'सेबी'ने जारी केलेल्या नव्या नियमानुसार ट्रेडिंगचं शिक्षण देतात लाइव्ह ट्रेडिंग सेशन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

advertisement
विविध स्टॉक मार्केट ट्रेनिंग गुरू सध्या ट्रेडिंगचं शिक्षण देतात. लाइव्ह ट्रेडिंग सेशन्स हे त्याचं प्रमुख आकर्षण असतं; मात्र 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया'ने (सेबी) 29 जानेवारीला जारी केलेल्या नव्या सर्क्युलरनुसार त्यावर बंदी घातली आहे. याबद्दलचं शिक्षण देण्यास बंदी नाही; मात्र ते देताना लाइव्ह ट्रेडिंग सेशन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. 'मनीकंट्रोल'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
News18
News18
advertisement

स्टॉक मार्केट अर्थात शेअर बाजार या क्षेत्राबद्दल सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना आकर्षण असतं. सर्वसामान्यांनाही ते असतं; मात्र त्यात सहभागी होणाऱ्यांमध्ये सर्वसामान्यांचं प्रमाण खूप कमी होते. कोरोना महासाथीच्या काळात आणि त्यानंतर मात्र रिटेल इन्व्हेस्टर्स अर्थात किरकोळ गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. शेअर बाजार नवनवी उंची गाठू लागला, त्यात सहभागी होणं सोपं होऊ लागलं, अशा अनेक कारणांमुळे रिटेल इन्व्हेस्टर्सची संख्या वाढली. या सगळ्यामुळे फायनान्शियल बिझनेसेसची आणि आर्थिक बाबी समजावून सांगणाऱ्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सची संख्या वाढली. त्यातून स्टॉक मार्केट टिप्सही दिल्या जाऊ लागल्या. तसंच, गुंतवणुकीपेक्षाही ट्रेडिंगचं प्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूट्सची संख्याही वाढली. अवधूत साठे ट्रे़डिंग अकॅडमी, अस्मिता पटेल ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग अशा अनेक संस्था लाइव्ह ट्रेडिंग किंवा रिअल टाइम मार्केट सेशन्समुळे लोकप्रिय झाल्या.

advertisement

लाइव्ह स्टॉक मार्केट ट्रेड्स हे या इन्स्टिट्यूट्सचं वैशिष्ट्य. त्यामुळेच त्याकडे आकर्षित होणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. यामध्ये संबंधित शिक्षक त्याच्या टर्मिनलवर किंवा लाइव्ह इव्हेंट्समध्ये अगदी मोठ्या स्क्रीनवरही लाइव्ह ट्रेडिंग करतो. त्याचे विद्यार्थी ते ट्रेड्स कॉपी करून घेतात. त्यामुळे सेबीकडे इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर किंवा रिचर्स अ‍ॅनालिस्ट म्हणून नोंदणी नसलेल्या व्यक्तींकडून गुंतवणुकीचा सल्ला किंवा ट्रेडिंग कॉल्स दिले जाऊ लागले.

advertisement

आतापर्यंत अनेक आदेशांमध्ये सेबीने असं स्पष्ट केलं आहे, की शिक्षणाच्या नावाखाली गुंतवणूक सल्ला देता येणार नाही. असा सल्ला देणाऱ्या अ‍ॅडव्हायझरी बेकायदा आहेत. तसंच, पंप अँड डंप, फिन-एन्फ्लुएन्सर्स आणि ट्रेनर्सकडून केले जाणारे काउंटर ट्रेड्स अशा बाबींबद्दलही सेबीला चिंता वाटत आहे; मात्र इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझरी आणि इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन यांमध्ये नेमका फरक काय, हे आतापर्यंक सेबीने स्पष्टपणे मांडलं नव्हतं.

advertisement

आता ताज्या सर्क्युलरमध्ये मात्र ही उणीव भरून काढण्यात आली आहे. इन्व्हेस्टमेंट एज्युकेशनवर (गुंतवणूक शिक्षण) बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र ते शिक्षण देणाऱ्या व्यक्तींनी तीन महिन्यांपूर्वीच्या मार्केट प्राइसेसचा वापर करून शिक्षण देणं गरजेचं असल्याचं सेबीच्या ताज्या सर्क्युलरमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या/मनी/
'सेबी'चा मोठा निर्णय! शेअर मार्केट ट्रेडिंगचं प्रशिक्षण देताना लाइव्ह ट्रेडिंगचा वापर करण्यास बंदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल