TRENDING:

LPG : नो लाईन, नो वेटिंग; नंबर आणि ओटीपी टाका 10 सेकंदात मिळेल सिलिंडर; कुठे मिळेल हे LPG ATM?

Last Updated:

जसं आपल्याला पैसे हवे असतील तर आपण बँकेत न जाता रस्त्यावरच्या एटीएम (ATM) मधून काही सेकंदात रोकड काढतो, अगदी तसंच आता तुम्हाला 'भरलेला गॅस सिलिंडर' सुद्धा एका मशिनमधून मिळणार आहे. हो, हे खरं आहे.

advertisement
मुंबई : कल्पना करा, तुम्ही स्वयंपाकघरात छान बेत आखलाय आणि अचानक गॅस संपला! अशा वेळी एजन्सीला फोन लावणे, बुकिंग करणे आणि डिलिव्हरी बॉयची दोन-दोन दिवस वाट पाहणे. आहे तो गॅस कधी संपेल याची धास्ती मनात असणे. हा अनुभव गृहिणींसाठी अत्यंत डोकेदुखीचा असतो. घरातील गॅस संपणे म्हणजे अर्धी कामं ठप्प होण्यासारखं आहे. पण, आता तंत्रज्ञानाने या समस्येवर एक असा तोडगा काढला आहे, ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता.
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

जसं आपल्याला पैसे हवे असतील तर आपण बँकेत न जाता रस्त्यावरच्या एटीएम (ATM) मधून काही सेकंदात रोकड काढतो, अगदी तसंच आता तुम्हाला 'भरलेला गॅस सिलिंडर' सुद्धा एका मशिनमधून मिळणार आहे. हो, हे खरं आहे. गुरुग्राममध्ये भारताचे पहिले 'LPG ATM' सुरू झाले आहे, हे स्मार्ट व्हेंडिंग मशिन सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे.

advertisement

नक्की काय आहे हे 'LPG ATM' आणि कुठे सुरू झालंय?

हे अनोखं एटीएम गुरुग्राममधील हरियाणा, सोहना रोड, सेक्टर 33 येथील सेंट्रल पार्क फ्लॉवर व्हॅलीमध्ये लावण्यात आले आहे. भारत पेट्रोलियम (BPCL) च्या 'भारतगॅस'ने 'भारतगॅस इन्स्टा एलपीजी' (Bharatgas Insta LPG) या नावाने हे मशिन लाँच केले आहे. हे केवळ उत्तर भारताचंच नव्हे, तर संपूर्ण देशातील अशा प्रकारचं पहिलं आणि स्मार्ट एटीएम आहे.

advertisement

सिलिंडर मिळवण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटे

या मशिनची सर्वात मोठी खासियत म्हणजे, भरलेला सिलिंडर मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही रांग लावावी लागणार नाही किंवा डिलिव्हरी बॉयची वाट पाहावी लागणार नाही. हे मशिन 24 तास सुरू असते.

मशिनमधून सिलिंडर घेण्याची काय आहे पद्धत?

तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर मशिनवर टाका.

मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) व्हेरिफाय करा.

advertisement

तुमच्याकडील रिकाम्या सिलिंडरचा बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करा.

यूपीआय (UPI) किंवा डेबिट कार्डने पेमेंट करा.

मशिन आपोआप तुमचा रिकामा सिलिंडर आत घेते आणि काही सेकंदात तुम्हाला भरलेला नवीन सिलिंडर बाहेर देते.

लोखंडी टाकीला सुट्टी, आता मिळणार 'लाईटवेट' सिलिंडर

या एटीएममधून जुन्या जड लोखंडी टाक्यांऐवजी नवीन 'कंपोझिट' (फायबर) सिलिंडर दिले जात आहेत.

advertisement

जुन्या लोखंडी सिलिंडरचे एकूण वजन 31 किलो (14 किलो गॅस + 17 किलो टाकी) असते. मात्र, हे नवीन कंपोझिट सिलिंडर केवळ 15 किलोचे आहेत. यामुळे महिलांना किंवा ज्येष्ठांना तो उचलणे अत्यंत सोपे जाते.

या सिलिंडरची सर्वात महत्त्वाची सोय म्हणजे ते अर्ध-पारदर्शक असतात. त्यामुळे गॅस नक्की किती शिल्लक आहे, हे तुम्हाला डोळ्यांनी सहज दिसते. हे सिलिंडर गंजत नाहीत आणि सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रगत मानले जातात.

बीपीसीएल (BPCL) चा हा सध्या एक 'पायलट प्रोजेक्ट' आहे. याद्वारे स्वयंचलित गॅस वितरणाचे परीक्षण केले जात आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला आणि ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळाला, तर लवकरच मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्येही असे 'एलपीजी एटीएम' आपल्याला पाहायला मिळतील. सध्या लोकांना याबद्दल फारशी माहिती नसल्याने वापर कमी आहे, पण सोयीच्या दृष्टीने हे गेम-चेंजर ठरणार आहे.

डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. ज्यांना वेळेची कमतरता आहे किंवा जे कामामुळे घरी नसतात, अशा लोकांसाठी हे एटीएम वरदान ठरेल.

मराठी बातम्या/मनी/
LPG : नो लाईन, नो वेटिंग; नंबर आणि ओटीपी टाका 10 सेकंदात मिळेल सिलिंडर; कुठे मिळेल हे LPG ATM?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल