इतरांना 90 तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या सुब्रह्मण्यन यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? बिझनेस टुडे मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार 2023-24 मध्ये त्यांचे वेतन हे 51 कोटी रुपये इतके होते. गेल्या 3 वर्षाच्या तुलनेत त्यांच्या पगारात 43.11 टक्के इतकी वाढ झाली होती. 2024 साली सुब्रह्मण्यन यांचे मुळ पॅकेज 3.6 कोटी रुपये होते. सोबत 35.28 कोटी रुपयांचे कमिशन आणि अन्य भत्यांचा समावेश होता.
advertisement
कोण आहेत माया टाटा? नेटवर्थ 1.5 अब्ज डॉलर्स
या रिपोर्टमध्ये कंपनीचे चेअरमन सुब्रह्मण्यन यांच्या पगाराच्या आकडेवारीसोबत कंपनीत काम करणाऱ्या अन्य कर्माचाऱ्यांच्या पगारात किती अंतर आहे हे देखील सांगितले गेले होते. कंपनीत काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचे सरासरी पॅकेज 2023-24 मध्ये 9.55 लाख रुपये इतके होते. याचा अर्थ कंपनीतील कर्मचाऱ्यांपेक्षा चेअरमन सुब्रह्मण्यन यांचा पगार 534.57 टक्के जास्त होता.
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल? नव्हे इनकम टॅक्स ऑफिसर म्हणा, मिळतो इतका पगार
सुब्रह्मण्यन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ते कर्मचाऱ्यांना म्हणतात, मला वाइट वाटते की मी तुमच्याकडून रविवारी काम करून घेत नाही. जर मी असे करू शकलो तर मला अधिक आनंद होईल. कारण मी स्वत: रविवारी काम करतो. सुब्रह्मण्यन एवढेच बोलून थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले घरी थांबून तुम्ही पत्नीला किती वेळ पाहात बसला. घरात कमी आणि ऑफिसमध्ये अधिक वेळ द्या.
सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका सुरू झाल्यानंतर अखेर कंपनीला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.