TRENDING:

तुमच्याकडे फक्त 2 महिने, नंतर या महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीणचे पैसे

Last Updated:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार उघड झाल्याने सरकारने e-KYC अनिवार्य केले असून https://ladakibahin.maharashtra.gov.in वर दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करावी.

advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यभरातील कोट्यवधी महिलांना या योजनेचा थेट लाभ घेतला. मात्र निवडणुका झाल्यानंतर या योजनेतील घोटाळे समोर येऊ लागले. या योजनेमुळे महायुती सरकारला जनतेचा पाठिंबाही मिळाला. मात्र, योजनेत काही गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सरकार आता अलर्ट मोडवर आलं आहे. काही पुरुषांनी तसेच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी बोगस लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर सरकारनं पारदर्शकतेसाठी e-KYC अनिवार्य केलं आहे.
News18
News18
advertisement

राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की, योजनेतील सर्व पात्र लाभार्थिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा सुरू करण्यात आली आहे. सर्व भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे. अन्यथा भविष्यातील लाभांवर परिणाम होऊ शकतो.

सरकारच्या मते, ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे. पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र लाभार्थिनींना नियमित लाभ मिळावा यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर, e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्याने भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही ती उपयुक्त ठरणार आहे.

advertisement

KYC म्हणजे काय?

KYC म्हणजे Know Your Customer अर्थात "तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या" ही ओळख पडताळणी प्रक्रिया. या अंतर्गत लाभार्थिनींना आवश्यक कागदपत्रं जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांची माहिती द्यावी लागते.

ऑफलाईन KYC मध्ये प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

ऑनलाईन KYC ही डिजिटल पद्धत असून यात इलेक्ट्रॉनिक कागदपत्रं आणि बायोमेट्रिक डेटा वापरला जातो.

advertisement

बँका, वित्तीय संस्था, कंपन्या आणि सरकारी योजना यामध्ये KYC प्रक्रिया अनिवार्य केली जाते, कारण यामुळे ग्राहकांची खरी ओळख पटते आणि गैरवापर टाळता येतो.

पारदर्शकतेला सरकारचं प्राधान्य

कुठे आणि कसं करायचं E KYC

https://ladakibahin.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या

या सरकारी पोर्टलवर जा. तिथे लॉग इन पर्याय निवडा

मुख्य पानावर तुम्हाला e-KYC करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

advertisement

तुमचा Customer ID किंवा योजनेचा अर्ज क्रमांक टाका.

हा आयडी अर्ज करताना मिळालेल्या पावतीवर किंवा बँक/स्टेटमेंटवर असतो.

तुमचा मोबाईल नंबर टाकल्यावर त्या नंबरवर OTP (वन टाइम पासवर्ड) येईल.

आलेला OTP टाकून तुमची ओळख पटवा.

आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून सबमिट करा.

माहिती बरोबर असल्यास तुमचं e-KYC पूर्ण होईल. स्क्रीनवर तुम्हाला Successfully Completed असं लिहिलेलं दिसेल.

advertisement

ही संपूर्ण प्रक्रिया पुढच्या दोन महिन्या पूर्ण करणं आवश्यक आहे.

जे E KYC करणार नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांची नावं अर्जातून बाद केले जातील.

मराठी बातम्या/मनी/
तुमच्याकडे फक्त 2 महिने, नंतर या महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीणचे पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल