TRENDING:

कोण आहे क्यारा शर्मा? एक मेसेज पाठवला अन् पुढच्या 17 दिवसांत आयुष्य उध्वस्त झालं; प्रकार पाहून पोलिसांना धडकी भरली

Last Updated:

Fake Investment Groups: नोएडामध्ये क्यारा शर्मा नावाच्या WhatsApp प्रोफाइलने दिलेल्या गुंतवणुकीच्या आमिषामुळे अवघ्या 17 दिवसांत 12 कोटी रुपयांची महाठगी उघड झाली. बनावट ट्रेडिंग ग्रुप्स आणि खोट्या नफ्याच्या स्क्रीनशॉट्सच्या आधारावर काम करणाऱ्या या सायबर गँगने पोलिसांनाही सतर्कतेवर आणलं आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: नोएडामध्ये सायबर गुन्ह्यांचा कळसच गाठणारी घटना उघडकीस आली आहे. सेक्टर-47 येथे राहणाऱ्या इंद्रपाल चौहान यांना बनावट गुंतवणूक आणि ऑनलाइन नफ्याचे आमिष दाखवून तब्बल 12 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाची सुरुवात नेहमीच्या प्रकारेच झाली. व्हॉट्सॲपवर क्यारा शर्मा नावाच्या प्रोफाइलकडून आलेल्या मैत्रीपूर्ण मेसेजने. सुरुवातीला साध्या-भोळ्या गप्पा, त्यानंतर मोठ्या गुंतवणुकीत अवाढव्य नफा मिळेल असे खोटे आश्वासन… आणि काही दिवसांतच पीडित व्यक्तीची आजवरची सर्व कमाई साफ.

advertisement

बनावट गुंतवणूक ग्रुप्स

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांना SUNDARAN AMC-STAY Positive आणि 111 SUNDARAN AMC-INFINITE Possibilities अशा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले गेले. या ग्रुपमध्ये दररोज लाखोंच्या नफ्याचे बनावट स्क्रीनशॉट्स टाकले जात, तर ग्रुप ॲडमिन स्वतःला "शेअर बाजाराचा मास्टर" म्हणून ओळख देत होता.

advertisement

पीडिताने सुरुवातीला 50 हजार रुपये गुंतवले, त्यानंतर केवळ 17 दिवसांत 9 वेगवेगळ्या व्यवहारांतून 11,99,50,000 रुपये विविध खात्यांमध्ये पाठवले. ठगांनी विश्वास वाढवण्यासाठी सुरुवातीलाच नफ्यातून 9 लाख रुपये काढून देण्याची परवानगी दिली आणि याच क्षणी पीडिताला वाटलं की व्यवहार खरे आहेत. पण खरी फसवणूक तर इथूनच सुरू झाली.

advertisement

IPO चं आमिष

यानंतर फ्रॉड गँगने EXATO TECHNOLOGIES LTD च्या कथित IPO साठी 17 कोटी रुपयांची मागणी केली. एवढी मोठी मागणी पाहून इंद्रपाल चौहान यांना समजलं की हे नफ्याचं खेळ नाही, तर आयुष्यभराची जमवाजमव बुडण्याचा डाव आहे. त्यांना शंका येताच त्यांनी तत्काळ सेक्टर-36 सायबर क्राईम थाण्यात धाव घेत FIR नोंदवली.

advertisement

मोठ्या गँगचा संकेत

12 कोटींच्या या महाघोटाळ्यामुळे सायबर पोलिसही अलर्टवर आले आहेत.

सर्व खात्यांची तपासणी सुरू आहे

व्यवहारांचे ट्रेल ट्रॅक केले जात आहेत

पैसे गोठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

एडीसीपी सायबर क्राईम शव्या गोयल यांनी सांगितले की हा प्रकार एका मोठ्या, संघटित सायबर नेटवर्कशी जोडलेला असू शकतो. जे हाय-एंड व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स चा वापर करून लोकांना करोडोंमध्ये लुटत आहे. पोलिसांची टीम याचा सखोल तपास करत असून लवकरच या रॅकेटमागील गुन्हेगारांना गाठून प्रकरणाचा खुलासा केला जाईल.

मराठी बातम्या/मनी/
कोण आहे क्यारा शर्मा? एक मेसेज पाठवला अन् पुढच्या 17 दिवसांत आयुष्य उध्वस्त झालं; प्रकार पाहून पोलिसांना धडकी भरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल