TRENDING:

Microsoft Investment In Mumbai : मायक्रोसॉफ्टला मुंबईची भुरळ, अब्जावधींची गुंतवणूक, ४५ हजार नोकऱ्या, CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज

Last Updated:

Microsoft in Investment :राज्याच्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने आज महत्त्वाची बैठक पार पडली. दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत गुंतवणूक केली जाणार आहे.

advertisement
मुंबई: राज्याच्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने आज महत्त्वाची बैठक पार पडली. दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत गुंतवणूक केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची महत्वाची बैठक पार पडली. मायक्रोसॉफ्टकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून, यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनातील कामकाजातून तातडीने मुंबई गाठली.
मायक्रोसॉफ्टला मुंबईची भुरळ, अब्जावधींची गुंतवणूक, ४५ हजार नोकऱ्या, CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज
मायक्रोसॉफ्टला मुंबईची भुरळ, अब्जावधींची गुंतवणूक, ४५ हजार नोकऱ्या, CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज
advertisement

बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सत्या नडेला यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात उभारण्यात येणाऱ्या GCC – Global Capability Center या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. सुमारे 20 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रावर हा ग्लोबल केंद्र उभारला जाणार असून, त्यातून जवळपास 45 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मायक्रोसॉफ्टसोबत सामंजस्य करार (MoU) होणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.

advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राला AI हब बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अत्यंत सकारात्मक आणि पुढाकार घेणाऱ्या भूमिकेत आहे. बैठकीत त्यांना मायक्रोसॉफ्टचे ‘Prime AI OS’ चे डेमो दाखवण्यात आले. कृषी, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रांत AI ची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, यावरही दोन्ही बैठकीत चर्चा झाली.

भारतात मायक्रोसॉफ्टची अब्जावधींची गुंतवणूक...

दरम्यान, भारतात मायक्रोसॉफ्टची मोठी गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्ट भारतात तब्बल 17.5 अब्ज डॉलर (सुमारे 1.57 लाख कोटी रुपये) गुंतवणार आहे. मायक्रोसॉफ्टची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. AI, क्लाउड आणि डेटा सेंटरसाठी पायाभूत सुविधा उभारणे, लाखो भारतीयांना नव्या AI कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आणि सुरक्षित डेटा इकोसिस्टम निर्माण करणे हा या गुंतवणुकीचा उद्देश असल्याचे नडेला यांनी स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Microsoft Investment In Mumbai : मायक्रोसॉफ्टला मुंबईची भुरळ, अब्जावधींची गुंतवणूक, ४५ हजार नोकऱ्या, CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल