विजेत्याने सेंट लुइसमधील QuikTrip स्टोअर वरून आपलं लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं. त्यांच्या तिकिटातील नंबर होते: 11, 23, 44, 61, 62 आणि पावरबॉल 17. न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या इंटरव्यूमध्ये त्यांनी सांगितले की, रातोरात अरबपति झाल्यानंतरही त्यांचं जीवन अगदी साधं आणि सामान्य आहे. त्यांनी मजेशीरपणे म्हटले की, जेव्हा ते रात्री कपडे धुतात, तेव्हा त्यांना नवीन आलेली श्रीमंती जाणवते.
advertisement
त्याची ही लॉटरी जिंकण्याची बातमी सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्मवर चर्चेचा केंद्रबिंदू बनली.
जैकपॉट जिंकल्यानंतर विजेत्याने सांगितले की, त्याला झोप कमी येते, पण ही त्याच्यासाठी “सगळ्यात मोठी समस्या” आहे. त्यांनी ठरवले की, पहिल्या वर्षात ते फक्त स्वतःसाठी आणि बायकोसाठी वेळ घालवतील आणि पैसे खर्च करतील. पुढे मजेशीरपणे त्यांनी म्हटलं की, त्यांची बायकोच आता त्यांना बाहेर फिरण्यासाठी भाग पाडत आहे.
लॉटरी जिंकलेल्या या व्यक्तीनं आपले पैसे कुठे आणि कसं खर्च करायचे याचा बेसिक प्लान बनवला आहे. त्यामुळे एवढे पैसे जिंकून देखील त्यांच्या जीवनात साधेपणा आणि कौटुंबिक लक्ष पूर्ववत राहिले आहे. ही लॉटरी जिंकण्याची घटना त्यांच्या जीवनात एक आविस्मरणीय अनुभव आणि शिकवण ठरली आहे.
एखाद्या व्यक्तीला एवढे पैसे मिळाले तर तो महागड्या वस्तू विकत घेईल, गाडी बंगला घेईल, चैनीच्या वस्तू विकत घेईल. मग बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करेल. पण या व्यक्तीने एवढा साधा आणि गरजेच्या गोष्टींचा विचार केला हे नक्कीच अनेकांसाठी थोडं शॉकिंग आहे.
या विजेत्याने ऐतिहासिक जैकपॉट टेक्सासमधील दुसऱ्या विजेत्याबरोबर शेयर केला. त्यांच्या हिस्स्याचा पुरस्कार $893.5 मिलियन आहे, जो मिसौरीतील सर्वात मोठा Powerball पुरस्कार ठरला आहे. यापूर्वीचा रेकॉर्ड $293.7 मिलियन होता.
साल 2025 मध्ये आतापर्यंत चार विजेते झाले आहेत, ज्यात कॅलिफोर्निया, केंटकी आणि ओरेगॉन येथील खेळाडूंचा समावेश आहे. विजेत्यांना ही रक्कम 30 किस्तांमध्ये घेणे किंवा एकमुश्त घेणे याचा पर्याय होता. पहिल्या वर्षाचा त्यांच्या जीवनातील फोकस आराम, कौटुंबिक वेळ आणि खर्चाचे उद्दिष्ट ठरवण्यावर असेल.