TRENDING:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: खुशखबर! डोमिसाईलची अट नाही, अर्ज भरण्याची मुदतही वाढवली

Last Updated:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 update : या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे.

advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Scheme) महत्त्वाची घोषणा केली आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी 1 जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात केली आहे. या योजनेची मुदत १५ जुलैपर्यंत होती त्यामुळे सगळीकडे ऑफलाईन अर्ज भरायला गर्दी आणि चेंगराचेंगरी होत होती.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नियमात बदल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नियमात बदल
advertisement

काय आहे अर्ज भरण्याची अंतिम मुदत? (Ladki Bahin Yojana 2024 Application Deadline) 

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे. तब्बल दीड महिना या योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिला, स्त्रिया, बहिणींना आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी तुम्हाला फक्त ऑफलाईन अर्ज भरता येणार आहेत.

advertisement

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्रता काय? (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana eligibility) 

21 ते 60 वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. या अटीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी थोडासा बदल केला असून मर्यादा वाढवण्यात आली आहे. 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना आता अर्ज करता येणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करणाऱ्यांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवं ही अट ठेवण्यात आली आहे.

advertisement

Ladki Bahin Yojana साठी कुठे करायचा अर्ज, जाणून घ्या कोणती कागदपत्र आहेत मस्ट

कोणती कागदपत्र जमा करणं आवश्यक? (Ladki Bahin Yojana required documents) 

कागदपत्रांमध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट आधी कंपल्सरी करण्यात आलं होतं. मात्र ही अट शिथिल करण्यात आली आहे. डोमेसाईल ऐवजी आता जन्माचा दाखल जमा केल्यास चालणार आहे. पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या व्यक्तींना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट मिळू शकते. आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मूळ अधिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साइज फोटो कागदपत्र आवश्यक आहे.

advertisement

कुठे जमा करायचा अर्ज?(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Where to submit the application) 

ही सगळी कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे किंवा ग्रामसेवकाकडे तुम्हाला जमा करायची आहेत. तुम्ही शहरी भागात राहात असाल तर तुम्हाला वॉर्ड ऑफिसमध्ये ही कागदपत्र जमा करायची आहेत.

किती मिळणार लाभ? (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 benefit)

advertisement

या अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सभर केले जातील. लाभार्थींना दर महिन्याला दीड हजार रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार आहे.

मराठी बातम्या/मनी/
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: खुशखबर! डोमिसाईलची अट नाही, अर्ज भरण्याची मुदतही वाढवली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल