Ladki Bahin Yojana साठी कुठे करायचा अर्ज, जाणून घ्या कोणती कागदपत्र आहेत मस्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme : 1 जुलैपासून या योजनेचे अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. 15 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज घेतले जाणार नाहीत.
मुंबई : राज्यात अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केला. या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme) महाराष्ट्रातील जनतेसाठी आणली आहे. या योजनेसाठी (Maharashtra Welfare schemes) आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ऑफलाईन अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी तुम्ही कुठे अर्ज करू शकता कोणती कागदपत्र आवश्यक आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोण लाभ घेऊ शकतं? (Who is Eligible Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme)
21-60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महाराष्ट्रातील रहिवासी असावी. त्यांचं कुटुंबातील वार्षिक उत्पन्न आहे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, याशिवाय त्या घरातील कोणीही सरकारी नोकरीतील कर्मचारी नसावे अथवा इनकम टॅक्स भरणारे नसावे.
advertisement
कोणती कागदपत्र लागणार? (Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme important Documents)
ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना आपलं आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मूळ अधिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साइज फोटो, योजनेचा अर्ज हे सगळं तुम्हाला ग्रामसेविका किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरुन नोंदणी करायची आहे. तर निमशहरी आणि शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसमध्ये ही नोंदणी करायची आहे.
advertisement
1 जुलैपासून या योजनेचे अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. 15 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज घेतले जाणार नाहीत. या अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सभर केले जातील. लाभार्थींना दर महिन्याला दीड हजार रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2024 1:54 PM IST


