Pakhala Bhaat : तुम्ही 'पखाला भात' खाल्लाय? कॉमेडियन भारती सिंगचा आहे फेव्हरेट! फक्त 5 मिनिटांत होतो तयार
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Bharati singh favorite recipe pakhala bhaat : आपल्याला एका व्हिडिओमध्ये भारतीने तिची आत्ताची फेव्हरेट रेसिपी पखाला भात याबद्दल सांगितलं आहे. या भाताचे फायदे, तिला तो का आवडतो आणि तो किती कमी वेळेत तयार होतो याबद्दल सांगितलं आहे.
मुंबई : कॉमेडियन भारती सिंगबद्दल तुम्हाला माहीतच असेल. ती एक उत्तम कॉमेडियन आहे आणि जितकी ती च्या कॉमेडीचा प्रसिद्ध आहे तितकीच ती आता युटूबवरही आहे. भारती तिच्या घराच्या कुकसोबत अनेक रेसिपीचे व्हिडीओ बनवून शेअर करत असते. असाच तिने एका रेसिपीविषयी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
भारतीने तिची आत्ताची फेव्हरेट रेसिपी पखाला भात याबद्दल आपल्याला सांगितलं आहे. या भाताचे फायदे, तिला तो का आवडतो आणि तो किती कमी वेळेत तयार होतो याबद्दल सांगितलं आहे. पखाला भाताची ही रेसिपी recipesby_rama या इंस्टाग्राम चॅनेलवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया भारतीचा आवडता पखाला भात कसा बनवायचा.
हा पदार्थ एकदम हलका, थंडगार आहे. ज्यांना खूप उन्हात काम करावं लागत, त्यांच्यासाठी हा पखाला भात हा एक उत्तम पर्याय असू शकतो. असं कॉमेडियन भारती सिंगने सांगितलं आहे. नाश्त्यात पखाला भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. हा एक पारंपारिक पदार्थ ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
advertisement
पखाला भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- 1 वाटी उकडलेले तांदूळ
- 1 कप थंड पाणी किंवा दही
- चवीनुसार मीठ
- 1 छोटा कांदा, बारीक चिरलेला
- 1 ते 2 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा मोहरीचे तेल
- कोथिंबीर
पखाला भात बनवण्याची पद्धत
- एका भांड्यात भात घ्या. त्यात थंड पाणी किंवा दही घाला आणि व्यवस्थित एकत्र करा.
advertisement
- त्यामध्ये मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करा.
- आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यामध्ये तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं आणि हिंग टाकून तडका तयार करा.
- तयार तडक भातामध्ये टाका.
- शेवटी वरून छान कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
advertisement
advertisement
तर अशाप्रकारे तुमचा स्वादिष्ट आणि झटपट बनणारा पखाला भात तयार आहे. हा पदार्थ उन्हाळ्या तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. आणि यामध्ये दह्यामुळे भरपूर प्रोबायोटिक असतात, जे तुमचे पचन सुधारते. या पखाला भातामुळे उन्हाळ्यात उष्माघातापासून तुमचे रक्षण होते. हा खाल्ल्याने दीर्घकाळ तुमची ऊर्जा टिकून राहते आणि अशक्तपणा येत नाही.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 2:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Pakhala Bhaat : तुम्ही 'पखाला भात' खाल्लाय? कॉमेडियन भारती सिंगचा आहे फेव्हरेट! फक्त 5 मिनिटांत होतो तयार










