TRENDING:

Voting Card नाही तरीही कसं करायचं मतदान? 12 डॉक्युमेंट्स महत्त्वाचे, तुमच्याकडे आहेत का?

Last Updated:

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी १५ जानेवारीला मतदान, १ कोटी ३४४ हजार मतदार, १७०० उमेदवार; दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सोय, निकाल १६ जानेवारी २०२६.

advertisement
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी उद्या, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मुंबईकर आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मुंबईत सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. ज्या मतदारांकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र (EPIC) नाही, त्यांना खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र दाखवून मतदान करता येईल.
News18
News18
advertisement

१. आधार कार्ड

२. पॅन कार्ड

३. पासपोर्ट

४. ड्रायव्हिंग लायसन्स

५. सरकारी कर्मचाऱ्यांचे फोटो ओळखपत्र

६. बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक

७. मनरेगा जॉब कार्ड

८. पेन्शनचे फोटो असलेले दस्तऐवज

९. खासदार किंवा आमदारांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

१०. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे स्मार्ट कार्ड

११. स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र

advertisement

१२. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (फोटो असलेले)

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगरानी यांनी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्रांच्या परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

advertisement

निवडणुकीची काही महत्त्वाची आकडेवारी

एकूण वॉर्ड: २२७

मतदान वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० (गुरुवार, १५ जानेवारी)

एकूण मतदार: सुमारे १ कोटी ३ लाख ४४ हजार

एकूण उमेदवार: १,७०० (८७९ महिला आणि ८२१ पुरुष)

निकाल: शुक्रवार, १६ जानेवारी २०२६

मराठी बातम्या/मनी/
Voting Card नाही तरीही कसं करायचं मतदान? 12 डॉक्युमेंट्स महत्त्वाचे, तुमच्याकडे आहेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल